Cape Town Test : केपटाऊन कसोटी ठरली इतिहासातील सर्वात लहान कसोटी! 91 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत

Cape Town Test : केपटाऊन कसोटी ठरली इतिहासातील सर्वात लहान कसोटी! 91 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत

पुढारी ऑनलाईन डेस्क : Cape Town Test : केपटाऊन कसोटीत भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 गडी राखून पराभव केला. गोलंदाजांचे वर्चस्व राहिलेल्या या कसोटीत विकेट्सची पडझड सातत्याने पहायला मिळाली. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेला 55 धावांत गुंडाळल्यानंतर भारतीय संघच 153 धावांवर बाद झाला. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने 176 धावा केल्या आणि टीम इंडियाला 79 धावांचे लक्ष्य दिले. टीम इंडियाने दुस-या दिवशी उपाहारानंतर 3 गडी गमावून हे छोटे लक्ष्य गाठले.

91 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत निघाला

केपटाऊनमधील न्यूलँड्स स्टेडियमवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटीचा विजेता ठरण्यासाठी पाच सत्रे आणि 642 चेंडूंचा खेळ झाला. भारताने दक्षिण आफ्रिकेला दोन डावात 55 आणि 176 धावांत गुंडाळल्यानंतर 7 गडी राखून विजय मिळवला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात लहान सामना ठरला आहे. याआधी 1932 मध्ये मेलबर्न येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामना सर्वात कमी कालावधीत संपली होती. त्या तो सामना केवळ 656 चेंडूंत संपला होता.

चेंडूंच्या बाबतीत इतिहासातील सर्वात लहान कसोटी सामना

642 चेंडू : भारताने दक्षिण आफ्रिकेचा सात गडी राखून पराभव केला (2023; केपटाऊन)
656 चेंडू : ऑस्ट्रेलियाने द. आफ्रिकेचा एक डाव आणि 72 धावांनी पराभव केला (1932; मेलबर्न)
672 चेंडू : इंग्लंडने वेस्ट इंडिजचा चार गडी राखून पराभव केला (1935; ब्रिजटाऊन)
788 चेंडू : इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा एक डाव आणि 21 धावांनी पराभव केला (1888; मँचेस्टर)
792 चेंडू : ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 61 धावांनी पराभव केला (1888; लॉर्ड्स)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news