पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया चषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना पुन्हा एकदा पावसामुळे रद्द झाला आहे. आशिया चषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान आमने-सामने होते. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. 24 व्या षटकानंतर पावसाला सुरुवात झाली आणि खेळ तिथेच थांबवावा लागला आहे. आशिया चषकातील यापूर्वीचाही भारत-पाक सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. भारत-पाक सामन्याचे महत्त्व लक्षात घेता. या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. हा सामना राखीव दिवशी खेळवण्यात येईल.
आजच्या सामन्यात टीम इंडियाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी धडाकेबाज फलंदाजी करत संघाला दमदार सुरुवात करुन दिली. दोघांनीही अर्धशतक झळकावले. मात्र यानंतर दोघेही झटपट बाद झाले. यानंतर विराट कोहली आणि के.एल राहुल यांनी धावांची गती कायम ठेवली. 24षटकांचा खेळापर्यंत भारताने दोन गडी गमावत 147 धावा केल्या. मात्र यानंतर पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला आहे.
121 धावांवर भारतीय संघाची पहिली विकेट पडली. कर्णधार रोहित शर्मा 49 चेंडूत 56 धावा करून बाद झाला. शादाब खानने त्याला फहीम अश्रफकडे झेलबाद केले. रोहितने आपल्या खेळीत सहा चौकार आणि चार षटकार मारले. 17 षटकांनंतर भारताची धावसंख्या एका विकेटवर 122 धावा होती.