चट्टोग्राम; वृत्तसंस्था : भारताने 2 बाद 258 धावा करून आपला दुसरा डाव घोषित केला. अशाप्रकारे पहिल्या डावात 274 धावांची भर घालत भारताने 512 धावांचा डोंगर रचला आणि यजमानांसमोर विजयासाठी 513 धावांचे लक्ष्य ठेवले. सामन्याच्या तिस-या दिवशी टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिल (110) आणि मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा (नाबाद 102) यांनी शतकी खेळी साकारली. गिल बाद झाल्यानंतर भारताने पुजाराला शतक पूर्ण करण्यासाठी वेळ दिला. पहिल्या डावात 90 धावा करून बाद झालेल्या पुजाराने अखेर त्याच्या कारकिर्दीतील 19वे शतक पूर्ण केले. तब्बल 51 व्या इनिंगनंतर त्याला तीन आकडी धावसंख्या गाठण्यात यश आले आहे. यानंतर करताच लगेचच केएल राहुलने डाव घोषित केला.
दरम्यान, भारताच्या 404 धावांचा पाठलाग करताना बांगला देशचा संघ तिसऱ्या दिवशी 150 धावांवर गुंडाळला. कुलदीप यादवने ५ विकेट घेतल्या. शुक्रवारी तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर कुलदीप यादवने इबादोत हुसेनला माघारी पाठवले. पंतने त्याचा झेल घेतला. तर अक्षर पटेलने मेहदी हसन मिराझची शेवटची विकेट घेतली. बांगलादेशचा पहिला डाव 55.5 षटकांत सर्व बाद 150 धावांवर गुंडाळला. यामुळे भारताने बांगला देशवर 250 हून अधिक धावांची आघाडी घेतली. त्यानंतर बांगलादेशला फॉलोऑन न देता भारतीय संघाने दुसरा डाव खेळण्यास सुरुवात केली. यामुळे बांगलादेश समोर मोठी धावसंख्या उभी करण्याचे भारताचे लक्ष्य आहे.
तिसऱ्या दिवशी लंचपर्यंत भारतीय संघाने दुसऱ्या डावात एकही विकेट न गमावता 36 धावा केल्या होत्या. यासह भारताची एकूण आघाडी 290 धावांवर पोहोचली होती. २२ व्या षटकाच्या ४ थ्या चेंडूला खालेद अहमद याने केएल राहुलला बाद केले. त्याने ६२ चेंडूत २३ धावा केल्या. २५ षटकापर्यंत भारताने १ गडी गमावून ७६ धावा केल्या. शुभमन गिल शतक करून बाद झाला. मेहदी हसन मिराजने महमुदुल हसन जॉय करवी त्याला झेलबाद केले. गिलने १५२ चेंडूत ११० धावा केल्या. या सामन्यात चेतेश्वर पुजाराने दुसऱ्यांदा अर्धशतक झळकावले. पहिल्या डावात त्याने ९१ धावा केल्या होत्या. या डावात त्याने ८७ चेंडूत ५० धावा पूर्ण केल्या. भारताने ५५ षटकापर्यंत २ गडी गमावून २१७ धावा केल्या.
भारतीय संघाचा पहिला डाव 404 धावांवर संपला. प्रत्युत्तरात मैदानात उतरलेल्या बांगला देशची सुरुवात खराब झाली. डावाच्या पहिल्याच चेंडूवर सिराजने डावखुरा सलामीवीर नजमुल हुसेन शांतोला गोल्डन डकवर बाद केले. विकेटकिपर पंतने त्याचा झेल पकडला. उमेशने चौथ्या षटकाच्या तिसर्या चेंडूवर यासिर अलीला (4) बोल्ड केले. यानंतर सिराजने आपल्या गोलंदाजीला धार देत 13.2 आणि 17.2 व्या षटकात अनुक्रमे लिटन दास (24), झाकीर हसनला (20) तंबूत पाठवले. त्याने अक्षरश: बांगला देशच्या टॉप ऑर्डरला खिंडार पाडले. यानंतर कुलदीप यादवने आपल्या फिरकीच्या जादूने उर्वरित बांगला देशी फलंदाजांना नाचवले. 22 महिन्यांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार्या कुलदीपने पहिल्याच षटकात विकेटची चव चाखली. त्याने बांगला देशचा कर्णधार शकीब अल हसनला (3) आपला पहिला बळी बनवला. त्यानंतर नरुल हसन (16), मुशफिकर रहीम (28), तैजुल इस्लाम (0) यांना कुलदीपने आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. खेळाच्या दुसर्या दिवशी भारताचा हा चायनामन गोलंदाज 10 षटकांत 33 धावा देऊन सर्वाधिक 4 बळी घेण्यात यशस्वी झाला. बांगला देशला लागलेल्या पहिल्या 4 धक्क्यांपैकी सिराजने एकट्याने 3 बळी घेतले.
तत्पूर्वी, भारत आणि बांगला देश यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी बुधवारी भारताने सहा गडी गमावत 278 धावा केल्या होत्या. दुसर्या दिवशी श्रेयस अय्यर आणि आर. अश्विन फलंदाजीला आले, मात्र अय्यरला 86 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. परंतु त्यावेळी 300/315 धावाही दुरापस्त वाटत असताना कुलदीप आणि अश्विन यांनी 82 धावांची भागीदारी केल्यामुळे भारताला चारशे धावांचा टप्पा गाठता आला. त्याचवेळी आर. अश्विननेही आपले अर्धशतक पूर्ण केले. भारताने पहिल्या डावात 404 धावा केल्या.
यजमान संघ फॉलोऑन खेळतो की नाही हे टीम इंडियाच्या थिंक टँकच्या निर्णयावर अवलंबून असते. अलीकडच्या काळात, टीम इंडियाने विरोधी संघांना फॉलोऑन न देण्याची परंपरा केली आहे, भारतीय कर्णधार के. एल. राहुल आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी ही परंपरा कायम ठेवली.
संक्षिप्त धावफलक : भारत पहिला डाव : सर्वबाद 404 धावा. (चेतेश्वर पुजारा 90, श्रेयस अय्यर 86, आर. अश्विन 58, कुलदीप यादव 40. तैजुल इस्लाम 4/133, मेहदी हसन मिराज 4/122.) बांगलादेश पहिला डाव : 8 बाद 188 धावा. (मुशफिकूर रहिम 28, लिट्टन दास 24. कुलदीप यादव 4/33, मोहम्मद सिराज 3/14)