मुंबई, वृत्तसंस्था : बीसीसीआयने उर्वरित दोन कसोटी (IND vs AUS) सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा आज केली. लोकेश राहुल याला डच्चू दिला जाईल, अशी अपेक्षा होती; परंतु संघ व्यवस्थापन त्याच्या पाठीशी ठाम उभा राहिला. कसोटी संघातील उपकर्णधारपद राहुलकडून काढून घेतले आहे. जयदेव उनाडकट पुन्हा संघात परतला आहे. रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी त्याला रीलिज केले गेले होते. त्याच्या नेतृत्वाखाली सौराष्ट्रने रणजी करंडक उंचावला. भारताच्या वन-डे संघाचीही आज घोषणा करण्यात आली. कौटुंबिक कारणास्तव रोहित शर्मा पहिल्या वन-डेत खेळणार नाही, त्याच्या अनुपस्थितीत हार्दिक पंड्या नेतृत्व करेल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील तिसरी कसोटी 1 ते 5 मार्चदरम्यान तर चौथी कसोटी 9 ते 13 मार्चपासून खेळवण्यात येणार आहे. यानंतर दोन्ही संघांदरम्यान 17, 19, 22 मार्चला तीन वन-डे सामने होणार आहेत.
तिसर्या व चौथ्या कसोटी साठीचा संघ : रोहित शर्मा, लोकेश राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, के.एस. भरत, इशान किशन, आर. अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जयदेव उनाडकट.
भारताचा वन डे संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल, इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उम्रान मलिक, शार्दूल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट.
बुमराह आता थेट आयपीएलमध्येच
दीर्घकाळापासून दुखापतीमुळे संघाच्या बाहेर असलेला भारताचा मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कोणत्याच मालिकेत निवड करण्यात आलेली नाही. तो वन-डे मालिकेलाही मुकणार याचे वृत्त दै. 'पुढारी'ने याआधीच दिले होते. अपेक्षेप्रमाणे तो आता थेट आयपीएलमध्येच खेळाताना दिसणार आहे.