Ind vs Aus 4th T20 : भारताचा ऑस्ट्रेलियावर २० धावांनी विजय; मालिकेत विजयी आघाडी

Ind vs Aus 4th T20
Ind vs Aus 4th T20

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी२० मालिकेतील चौथा सामना रायपूरच्या शहिद वीर नारायण सिंग स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर २० धावांनी विजय मिळवला. रिंकू सिंगची ४६ धावांची खेळी आणि अक्षर पटेलने पटकावलेल्या ३ विकेट्सच्या जोरावर भारताने हा विजय खेचून आणला. या विजयासह भारताने मालिका विजयही निश्चित केला आहे. भारताने मालिकेत ३-१ ने आघाडी घेतली आहे. (Ind vs Aus 4th T20)

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारताने रिंकू सिंग आणि जितेश शर्माच्या फटकेबाजीच्या जोरावर १७४ धावा केल्या असून ऑस्ट्रेलियासमोर १७५ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताच्या १७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला १५४ धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू हेडने २३ चेंडूमध्ये ३६ धावा, ट्रायव्हस हेड १६ चेंडूमध्ये ३१ धावा आणि मॅथ्यू वॅटने १९ चेंडूमध्ये २२ धावांचे योगदान दिले. भारताकडून अक्षर पटेलने ३, दीपक चहरने २ तर रवी बिश्नोई आणि आवेश खानने प्रत्येकी १ विकेट पटकावली. (Ind vs Aus 4th T20)

तत्पूर्वी, भारताकडून यशस्वी जयस्वाल २८ चेंडूमध्ये ३४ धावा, ऋतुराज गायकवाड २८ चेंडूमध्ये ३२ धावा, रिंकू सिंग २९ चेंडूमध्ये ४६ धावा आणि जितेश शर्माने १९ चेंडूमध्ये ३५ धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून तनवीर संघा २ तर बेन द्वारशुईसने ३ विकेट पटकावल्या. तर जेसन बेहरेनडॉर्फ आणि आरोन हार्डीने प्रत्येकी १ विकेट घेतली. सातत्याने विकेट पटकावल्याने भारताला १७४ धावांपर्यंत रोखण्यात ऑस्ट्रेलियाला यश आले आहे. (Ind vs Aus 4th T20)

भारतीय संघ – यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, दीपक चहर, आवेश खान, मुकेश कुमार (Ind vs Aus 4th T20)

ऑस्ट्रेलियन संघ – जोश फिलिप, ट्रायव्हस हेड, बेन मॅकडरमॉट, आरोन हार्डी, टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, मॅथ्यू वेड (c&wk), बेन द्वारशुइस, ख्रिस ग्रीन, जेसन बेहरेनडॉर्फ, तनवीर संघा (Ind vs Aus 4th T20)

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news