पितृ पंधरवडा अन् पावसामुळे भाज्यांच्या दरात वाढ

पितृ पंधरवडा अन् पावसामुळे भाज्यांच्या दरात वाढ

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पितृ पंधरवडा आणि गेले तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. पितृ पंधरवड्यात अळूची पाने, भेंडी, कारले, गवार, दोडके, काकडी व मटार आदींना अधिक मागणी असते; मात्र पावसामुळे आवक घटल्याने भाज्यांच्या दरात वाढ झाली असून, कोथंबिरीच्या एका पेंडीची किंमत 50 रूपये इतकी होती. पितृपक्ष शुक्रवार 29 सप्टेंबरपासून सुरू झाला असून, तिथीनुसार घरोघरी आपल्या पूर्वजांच्या स्मृतीप्रित्यर्थ नैवेद्य केला जातो. यामध्ये विविध फळभाज्या, पालेभाज्यांचा समावेश असतो. त्यामुळे फळभाज्या तसेच पालेभाज्यांनाही बाजारात मागणी वाढली आहे; मात्र गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे शेतकर्यांना भाज्यांची तोडणी करता आली नाही. परिणामी रविवारी शहरातील मंडईमध्ये भाज्यांची आवक घटल्याने दरात वाढ झाली.

शहरातील मोशी उपबाजार, चिंचवड, आकुर्डी तसेच पिंपरी येथील लाल बहादुर शास्त्री भाजी मंडईमधील किरकोळ बाजारातील प्रतिकिलो दर भेंडी 100 रूपये, कारले 80 रूपये, गावरान गवार 200 रूपये, दोडके 80 रूपये, काकडी 40 रूपये तर मटार 150 रूपये दराने विक्री झाली.

मोशी उपबाजारातील आवक (क्विंटल)
या आठवड्यात भेंडी 100, कारले 67, गवार 15, दोडके 15, काकडी 184, मटार 14, टोमॅटो 779, शेवगा 28, कांदा 705, बटाटा 1067, आले 40, लसूण 15 आणि गाजर 95 क्विंटल एवढी आवक झाली.

घाऊक बाजारातील प्रतिकिलो दर
भेंडी 32, कारले 30, गवार 60, काकडी 15, मटार 65, टोमॅटो 8, शेवगा 40, कांदा 13, बटाटा 11, आले 85, लसून 90 आणि गाजर 15 रूपये दराने विक्री होत आहे. मोशी उपबाजारात पालेभाज्यांच्या एकूण 27100 गड्डी, फळे 215 क्विंटल आणि फळ भाज्यांची आवक 4412 क्विंटल एवढी आवक झाली.

फळभाज्यांचे ः किलोचे भाव
कांदा 35 ते 40
बटाटा 25 ते 30
आले 200 ते 210
लसूण 240 ते 250
भेंडी 90 ते 100
टोमॅटो 20 ते 25
सुरती गवार 150 ते 160
गावरान गवार 200 ते 210
दोडका 80
भोपळा 80
कारली 80 ते 90
मटार 150 ते 160
वांगी 60 ते 70
भरीताची वांगी 70
तोंडली 80
पडवळ 80
फ्लॉवर 50 ते 60
कोबी 40 ते 50
काकडी 40
शिमला 50
शेवगा 70 ते 80
हिरवी मिरची 80
आळूची पाने 10 रूपयाला 4
वाल 120
पावटा 110
राजमा 120
श्रावणी घेवडा 120

पिंपरी मंडईतील पालेभाज्यांचे किरकोळ भाव
पालेभाज्या ः दर (प्रति जुडी)
मेथी 40
कोथिंबीर 50
कांदापात 30
शेपू 20
पुदिना 15
मुळा 15
चुका 20
पालक 20

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news