iNCOVACC : ‘इन्कोव्हॅक’चे 700 कोटी डोस तयार

iNCOVACC : ‘इन्कोव्हॅक’चे 700 कोटी डोस तयार

कोल्हापूर; राजेंद्र जोशी : असंख्य भारतीय ज्याची आतुरतेने वाट पहात होते ती कोरोनावरील नाकावाटे घ्यावयाची इन्कोव्हॅक लस आता भारतीय बाजारात उपलब्ध झाली आहे. या लसीच्या चाचणीच्या तीनही टप्प्यांमध्ये तिने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ही लस केवळ भारतीयांसाठीच नव्हे, तर जगातील नाकावाटे घेण्यात येणारी कोरोनावरील पहिली भारतीय बनावटीची लस म्हणून तिने बहुमान प्रस्थापित केला आहे.

हैदराबादस्थित भारत बायोटेक या कंपनीने कोरोना काळात मिळविलेले हे दुसरे लक्षणीय यश आहे. या कंपनीच्या मुख्य प्रवर्तक डॉ. कृष्णा इला यांनी रविवार (दि. 5) ही लस आरोग्य विश्वासाठी समर्पित केली. तिच्या पुरवठा साखळीचे काम दोन दिवसांपूर्वीच सुरू झाले असून कंपनीने यूडब्ल्यू मॅडिसन ग्लोबल हेल्थ या कंपनीबरोबर लसीच्या पुरवठ्याविषयी द्विपक्षीय करार केला आहे. ही कंपनी लसीविरुद्ध जनजागृती आणि पुरवठ्याचे काम करणार आहे. प्राथमिक स्तरावर या लसीचा पुरवठा केवळ सरकारी आणि खासगी रुग्णालयांना केला जाणार आहे. यानंतर यथावकाश ही लस खुल्या औषध दुकानांमध्ये उपलब्ध होईल.

कोरोनावर पहिल्या दोन लसींच्या डोसनंतर तिसरा बुस्टर डोस या लसीमार्फत घेता येतो. कोरोनावरील नाकावाटे घेण्यात येणारी पहिली लस म्हणून त्याला मान्यताही मिळाली आहे. ही लस 2 ते 8 अंश सेल्सिअस तापमानात सुरक्षितरीत्या राहू शकते. साध्या घरगुती रेफ्रिजरेटरमध्येही ती ठेवता येते. भारत बायोटेकने या लसीची जागतिक गरज लक्षात घेऊन लसीच्या 700 कोटी डोसेसचे उत्पादन केले आहे. त्यासाठी प्रतिडोस 325 रुपये इतकी किंमत निश्चित करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news