‘सरकार आपल्या दारी’ मोबाईल व्हॅनचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

‘सरकार आपल्या दारी’ मोबाईल व्हॅनचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई पुढारी वृत्तसेवा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समस्या समाधान शिबीर (सरकार आपल्या दारी) महिलांसाठी शासकीय योजनांची माहिती देणाऱ्या या 'मोबाईल व्हॅन'चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे हा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हेदेखील उपस्थित होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समस्या (सरकार आपल्या दारी) ही मोबाईल व्हॅन दि. १९ एप्रिल पासून ते ३१ मे पर्यंत दररोज सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत मुंबई महापालिकेच्या सरकार आपल्या दारी हा उपक्रम सुरू असलेल्या वॉर्डमध्ये फिरणार आहे. या फिरत्या व्हॅन मध्ये एल ई डी स्क्रीन असून या मोबाईल व्हॅन च्या माध्यमातून महिलांसाठी शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news