Inaugurate New Parliament Building: नवीन संसद भवनात ठेवले जाणार ऐतिहासिक ‘सेंगोल’; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची माहिती

Inaugurate New Parliament Building
Inaugurate New Parliament Building

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: संसदेची नवीन वास्तू देशाचा इतिहास, सांस्कृतिक वारसा, परंपरा तसेच सभ्यतेला आधुनिकेची जोड देण्याचा सुंदर प्रयत्न आहे, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्घाटन कार्यक्रमावर राजकारण न करण्याचे आवाहन विरोधी पक्षांना केले आहे. उद्घाटन कार्यक्रमात सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आल्याचे देखील शहा यांनी बुधवारी (दि.२४) पत्रकार परिषदेतून स्पष्ट केले. विशेष म्हणजे नवीन संसदेच्या भवनात ऐतिहासिक 'सेंगोल' ठेवले जाणार असून, या निमित्ताने एक ऐतिहासिक परंपरा पुनर्जिवित (Inaugurate New Parliament Building) केली जाणार असल्याचे शहा म्हणाले.

संसदेची नवी इमारत विक्रमी वेळेत पुर्ण करण्यासाठी ६० हजारांहून अधिक मजुरांनी त्यांचे योगदान दिले आहे. उद्घाटन समारंभातून पंतप्रधानांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला जाईल. २८ मे ला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत पंतप्रधान ही वास्तू देशाला समर्पित करतील. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात पंतप्रधानांनी जे लक्ष्य निर्धारित केले होते,त्यातील एक लक्ष्य (Inaugurate New Parliament Building) आपल्या ऐतिहासिक परंपरांचा सन्मान आणि पुनर्जागरणाचा आहे, असे शहा म्हणाले.

पुढे बोलतांना शहा म्हणाले,पंतप्रधानांची दूरदर्शिताचे प्रतिची या नवीन संसद भवनाच्या वास्तूतून येते. संसदेच्या नवीन वास्तूत सेंगोल (राजदंड) ठेवला जाईल. सेंगोल इंग्रजांकडून सत्ता मिळण्याचे प्रतिक आहे. सेंगोल प्राप्त असलेल्यांकडून न्यायपूर्ण आणि निष्पक्ष शासनाची अपेक्षा केली जाते. अशात सेंगोल च्या स्थापनेसाठी देशाची संसद सर्वाधिक उपयुक्त, पत्रित तसेच योग्य स्थान कुठलेच असू शकत नाही. सेंगोल (Inaugurate New Parliament Building)  कुठल्याही संग्रहालयात ठेवणे योग्य ठरणार नाही. अशात देशाला संसदेची इमारत समर्पित करतांना पंतप्रधानांना तामिळनाडूतून आलेले सेंगोल प्रदान केले जाईल, असे शहा म्हणाले.

'संपदा' असा अर्थ असलेला 'सेंगोल' एक तमिळ शब्द आहे. सेंगोलची अनेक शतकांची परंपरा आहे. ही इतिहासाची ओळख आहे. पंतप्रधानांना यासंबंधी माहिती मिळाल्यानंतर याचा अभ्यास करण्यात आला. अभ्यासाअंती संसदेच्या उद्घाटन सोहळ्यातून सेंगोल देशासमोर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शहा म्हणाले.

Inaugurate New Parliament Building: काय आहे सेंगोल?

अध्यक्षांच्या आसनाजवळ पंतप्रधान 'सेंगोल' स्थापित करतील. हा एक ऐतिहासिक क्षण ठरेल. १४ ऑगस्ट १९४७ रोजी रात्री एका अनोख्या प्रक्रियेनूसार इंग्रजांकडून सत्ता हस्तांतरणाच्या रुपात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हा सेंगोल स्वीकारला होता. आता हा सेंगोल नवीन संसद भावनात स्थापित केले जाईल. ५ फूट लांब या राजदंडाला तमिळ भाषेत सेंगोल संबोधले जाते. सेंगोलची इतिहासात मोठी भूमिका आहे.

सेंगोल भारताच्या स्वातंत्र्याचे एक महत्वपूर्ण ऐतिहासिक प्रतिक आहे. इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली होती. तेव्हा सत्ता हस्तांतरणाचे प्रतिक रुपात सेंगोलचा उपयोग करण्यात आला होता. लॉर्ड माउंटबेटन यांनी १९४७ मध्ये सत्ता हस्तांरणाच्या प्रक्रियेसंबंधी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सोबत चर्चा केली होती. यानंतर नेहरूंनी सी.राजा गोपालचारी यांच्याशी सल्लामसलत केला होता. यावेळी राज गोपलचारी यांनी नेहरूंना सेंगोल संबंधीची माहिती दिली होती. यानंतर तामिळनाडूतून सेंगोल मागवण्यात आले आणि सेंगोल ला सत्तेच्या हस्तांरणाचे प्रतिक बनवण्यात आले होते. थिरुपापडुथुरई आधीनम् श्री ल श्री कुमारस्वामी तंबीरान यांनी नेहरूंना हा सेंगोल हस्तांतरित केला होता.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news