वागले की दुनिया : सखीच्‍या कॉलेजमध्‍ये रंगणार निवडणूक!

वागले की दुनिया : सखीच्‍या कॉलेजमध्‍ये रंगणार निवडणूक!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : छोट्या पडद्यावरील मालिका 'वागले की दुनिया – नयी पीढी नये किस्‍से' सतत मध्‍यवर्गीय व्‍यक्‍तीच्‍या दैनंदिन संघर्ष दाखवत आहे आणि ही मालिका आता तरूणांच्‍या समस्‍यांना प्रकाश झोतात आणणार आहे. आगामी कॉलेज निवडणुकीमुळे कॉलेजमधील विद्यार्थ्‍यांमध्‍ये तणाव वाढणार आहे, कारण ही निवडणूक महत्त्वपूर्ण असण्‍यासोबत त्‍यामधून तरूण पिढीमधील नेतृत्‍व कौशल्‍य पाहायला मिळणार आहे.

या मालिकेत तिवारीचा मुलगा अरूण तिवारी खूप संघर्षानंतर, तसेच राजेशकडून काही पैशांचे कर्ज घेतल्‍यानंतर सखीच्‍या कॉलेजमध्‍ये प्रवेश मिळवतो. कॉलेजमधील शिक्षण सुरू होते तसे अरूणला समजते की, त्याला कॅन्‍टीनमधील भोजनासारख्‍या मुलभूत गोष्‍टी परवडू शकत नाहीत आणि अशा स्थितीचा सामना करणारे त्‍याच्‍यासारखे इतर बरेच विद्यार्थी आहेत. अरूण कॉलेज निवडणुकीमध्‍ये उमेदवार म्‍हणून उभे राहत या समस्‍येचा सामना करण्‍याचे ठरवितो. कथानक अधिक रोचक होत आहे आणि अरूण भल्‍यासाठी परिवर्तन घडवून आणेल की नाही? हे फक्‍त येणारी वेळच सांगेल. या निवडणुकीचा कॉलेज व विद्यार्थ्‍यांवर काय परिणाम होईल? आणि सखी व वागले कुटुंबावर काय परिणाम होईल? हे पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

चिन्‍मयी साळवी उर्फ सखी वागले तिचे मत व्‍यक्‍त करताना म्‍हणाली की, 'मालिका 'वागले की दुनिया' मधील समस्‍या अधिक प्रखर बनल्‍या आहेत. जेथे आता या समस्‍यांमध्‍ये कॉलेज निवडणुकीची भर पडली आहे. इतर विद्यार्थ्‍यांप्रमाणेच सखीच्‍या कॉलेज जीवनावर कॅम्‍पस् निवडणुकीचा मोठा प्रभाव पडेल का?, आगामी एपिसोडमध्‍ये या समस्‍येशी सामना, मध्‍यमवर्गीय व्‍यक्‍तीचा संघर्ष आणि व्‍यक्‍ती अशा समस्‍येचा कशाप्रकारे सामना करू शकते हे पाहायला मिळणार आहे.'

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news