RTO विभागात जळगाव एम एच-19 तर चाळीसगाव एम एच – 52 नवी ओळख

RTO विभागात जळगाव एम एच-19 तर चाळीसगाव एम एच – 52 नवी ओळख
Published on
Updated on

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
एम एच 19 ही ओळख आतापर्यंत जळगाव जिल्ह्याची होती. मात्र यामध्ये नवीन ओळख जोडली गेलेली असून चाळीसगाव येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर करण्यात आले आहे. जळगाव वाहन पासिंगला मिळणारा एम एच १९ हा क्रमांक असून चाळीसगावला एम एच ५२ हा क्रमांक दिला जाणार आहे. लवकरच याठिकाणी स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कार्यान्वित होणार आहे.

जळगाव जिल्हा येथे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय निर्माण झाल्यापासून चाळीसगावला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाला मंजुरी मिळाली आहे. नुकतेच गृह विभागाचे अपप्प सचिव यांनी यासंदर्भात अध्यादेश जारी केलेले आहेत. जळगाव कार्यालयाच्या दर्जा वाढवण्यात आल्यानंतर चाळीसगावला स्वतंत्र उपप्रादेशिक कार्यालय मंजूर झाले आहे. भडगाव येथेही मागणी गेल्या काही दिवसापासून जोर धरत आहे. अनेक नागरिकांनी व राजकीय संघटनांनी याबाबत निवेदने शासनाला दिलेली आहेत. चाळीसगाव येथे उपप्रादेशिक कार्यालय हे चाळीसगाव शहर व तालुका पुरते मर्यादित राहणार आहे. भडगाव येथे प्रस्तावित असलेले कार्यालय मंजूर झाल्यास त्यात आजूबाजूच्या तालुके संलग्नित केले जाणार आहे.

चाळीसगाव स्वतंत्र आरटीओ कार्यालय झाल्यामुळे तेथे एम एच-52 असा नवीन नोंदणी क्रमांक देण्यात आलेला आहे. त्याशिवाय एक इंटर सेप्टर कोणालाही मंजुरी देण्यात आलेली आहे. कार्यालय उभारण्यासाठी शासनाने भाडेतत्त्वावर इमारत घेण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. या कार्यालयात एक डेप्युटी आरटीओ एक एआरटीओ चार मोटर वाहन निरीक्षक सहा दुय्यम मोटर व निरीक्षक, पाच लिपिक शिपाई अशी पदे शेत कार्यालयातून घेतली जाणार आहेत. जळगाव जिल्ह्याला आरटीओ कार्यालयाच्या परवाना देण्यात येत असताना एम एच -19 हा नोंदणी क्रमांक देण्यात येत होता. मात्र आता जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव तालुक्याला एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाले असून आरटीओ विभागातून चाळीसगाव साठी एम एच – 52 हा नोंदणी क्रमांक मिळणार असल्याने जळगावचे दोन नोंदणी क्रमांक राज्यात व देशात ओळखले जाणार आहेत. चाळीसगाव येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्यास मंजुरी मिळाली आहे. नवीन कार्यालयासाठी जागा, संबंधित अधिकारी, कर्मचारी, वाहन उपलब्ध करण्याबाबत आदेशात सूचना निर्गमित करण्यात आल्या असून कार्यालय कार्यान्वित झाल्यानंतर वाहनांना पासिंग करताना एम. एच ५२ हा क्रमांक मिळणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news