thirty first december : महाराष्ट्रात ४६% लोकांचा थर्टी फर्स्ट घरीच!

thirty first december : महाराष्ट्रात ४६% लोकांचा थर्टी फर्स्ट घरीच!
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : कोरोना काळाचे वाईट स्वप्न अजूनही डोळ्यांसमोरून जात नसले तरी राज्यातील लोकांनी जेएन-१ या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटला न घाबरता त्याचा सामना करण्याची तयारी सुरू केली आहे. अर्थात, असे करताना लोकांनी सावधगिरी बाळगण्याचा निर्धार केला असून, याच अनुषंगाने राज्यातील ४६ टक्के लोकांनी सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत घरी राहूनच करण्याचे ठरवले आहे, तर सहा टक्के लोक सेलिब्रेशनसाठी घराबाहेर पडणार असले तरी सोशल डिस्टन्सिंग पाळणार आहेत. (thirty first december)

कोरोनाचा नवा व्हेरिएंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेएन-१ ने राज्यात एन्ट्री केली आहे. कोरोनाचा प्रचार व प्रसारासाठी ही गर्दी कारणीभूत ठरू शकते, हे पाहता लोकल सर्कल या संस्थेने नवीन वर्षाचे स्वागत आणि कोरोनाची काळजी याबाबत लोकांना काय वाटते, हे जाणून घेतले. या सर्वेक्षणात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, पुणे, नागपूर या जिल्ह्यांमधील लोकांचा समावेश होता. (thirty first december)

हे सर्वेक्षण दोन श्रेणीमध्ये करण्यात आले. एका वर्गात, नवीन वर्ष कसे (सामूहिक की वैयक्तिक) व कुणासोबत साजरे करणार असा प्रश्न विचारला. त्याला सुमारे २ हजारांवर लोकांनी प्रतिसाद दिला. दुसऱ्या वर्गात मास्कच्या वापरासंबंधीचा प्रश्न होता. त्याला १,९६४ लोकांनी प्रतिसाद दिला. एकूणच लोक सभोवतीच्या वातावरणाबाबत जागरूक असल्याचे सर्वेक्षणातून जाणवले.

– सचिन तापडिया, संस्थापक, लोकल सर्कल

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news