अश्लील रॅप साँग प्रकरणी अभविपकडून पुणे विद्यापीठात तोडफोड

अश्लील रॅप साँग प्रकरणी अभविपकडून पुणे विद्यापीठात तोडफोड
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्न प्रलंबित ठेवणाऱ्या विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात सोमवारी ट्रॅफिक जाम आंदोलन केले. परंतु हे आंदोलन करत असताना त्यांनी विद्यापीठात तोडफोड केलीच शिवाय विद्यापीठ प्रशासनाच्या बैठकीत घुसून गोंधळ घातला.

विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये परवानगी नसताना अश्लील भाषेत केलेले रॅप साँग चे शूटिंग, शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या विद्यार्थ्यांचे न झालेले पदवी ग्रहण सोहळा व डिग्री सर्टिफिकेट न दिल्यामुळे विद्यार्थ्यांचे परदेशातील प्रलंबित प्रवेश, परीक्षांचे प्रलंबित निकाल व लागलेल्या निकालांमध्ये चुका,क्रीडा संकुलाचे उद्घाटन होऊन देखील विद्यार्थ्यांना वापरण्यास बंदी, बीएस्सी बीएडच्या विद्यार्थ्यांना कमवा व शिका योजनेचा १००% लाभ न देणे या सर्व विषयांना घेऊन आंदोलन करण्यात आले. अभाविपच्या या कृतीचा अन्य विद्यार्थी संघटनांनी मात्र निषेध केला असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

यासंदर्भात स्टुडंट हेल्पींग हँडसचे कुलदीप आंबेकर म्हणाले, विद्यापीठामध्ये विद्यार्थी संघटनेने आंदोलन करुन काचा फोडल्या, कुलगुरु-प्रकुलगुरु यांच्या समोर चालू मिटींगमध्ये घोषणा दिल्या. त्या मिटींगमध्ये त्यांनी अडथळा आणला यावर सुरक्षा विभाग,पोलीस प्रशासन काय करतेय? यांच्यावर गुन्हे दाखल करणार का, रँप करणार्‍या विद्यार्थ्याच्या बाबतीत जी भूमिका विद्यापीठानी घेतली ती आता घेणार का? विद्यार्थी हिताचे प्रश्न होते याबाबत शंकाच नाही. आंदोलन करणे याबाबत आमचे काहीही दुमतच नाही, कोणतेही लढाई लोकशाही मार्गांनी झालीच पाहीजे.पण हिंसा होत असेल,गालबोट लागत असेल तर हे दुर्दैवी आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करावी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news