चेंबूरमध्ये १६ विद्यार्थ्यांना मिड डे मिल्क पिल्याने विषबाधा; शताब्दी रुग्णालयात दाखल
मुंबई; पुढारी वृत्तसेवा : चेंबूरच्या आणिक गाव येथील पालिकेच्या हिंदी भाषिक शाळेतील ६ वी व ७ वीच्या विद्यार्थ्यांना शाळेतून दिल्या जाणाऱ्या मिड डे मिल्क पिल्याने विषबाधा झाली आहे. यातील १६ विद्यार्थ्यांना गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती शताब्दी रुग्णालायचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील पाकळे यांनी दिली.
संबधित बातम्या
आणिक गाव येथे पालिकेची शाळा असून विद्यार्थ्यांना सकाळी मिड डे मिल्क देण्यात येते. नेहमीप्रमाणे शुक्रवारी (दि.१३) रोजी सकाळी ९:१५ वाजता १८० विद्यार्थ्यांना मिड डे मिल्क देण्यात आले. काही वेळातच शाळेतील १६ विद्यार्थ्यांना उलटी, डोकेदुखी, चक्कर यासारख्या त्रास होऊ लागल्याने त्यांना गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले. यातील दोन विद्यार्थ्यांना जास्त त्रास होत असल्याने ट्यूबच्या साहाय्याने त्यांच्या शरीरातील विष बाहेर काढण्यात आले.
सर्वच विद्यार्थी सुखरूप असून २४ तास त्यांच्यावर देखरेखीखाली उपचार केल्यानंतर घरी सोडून देण्यात येणार असल्याची माहिती डॉ. सुनील पाकळे यांनी दिली.
हेही वाचा :