

पुढारी ऑनलाईन डेस्क : घरातच बनवा अंडा-किमाकरी आणि आपल्या कुटुंबीयांसोबत ही खास रेसिपी एन्जॉय करा. (Egg-Keema Curry ) किमा स्टाईल अंडा मसाला टेस्टी आणि ते चपाती किंवा भाकरीसोबतही खाता येते. एक प्रसिद्ध डिश म्हणजे अंडा किमाकरी जी, उकडलेल्या अंड्यांपासून बनवली जाते. मोठ्या प्रमाणात प्रथिने असणाऱ्या अंड्यांची ही रेसिपी वेगवेगळे मसाल्यांचा वापर करून बनवली जाते. (Egg-Keema Curry)
अंडा-खिमाकरीसाठी लागणारे साहित्य –
१) पावशेर मटणाचा खिमा
२) चार उकडलेली अंडी
३) पावशेर हिरवा मटर
४) तीन चमचे तेल
५) एक चमचा आलं-लसूण पेस्ट
६) अर्धा कप टोमॅटो प्यूरी
७) अर्धा कप बारीक चिरलेला कांदा
८) दोन लाल मिरच्या, दोन तमालपत्र
९) अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हळद
१०) अर्धा चमचा मिरची पावडर आणि धने पावडर
११) अर्धा चमचा गरम मसाला आणि मटण मसाला
१२) चार चमचे बारीक कापलेली कोथिंबीर
अंडा-खिमाकरी बनवण्याची कृती
१) सर्वांत पहिल्यांदा गॅसच्या आचेवर कढई ठेवून तेल गरम करून घ्या. त्या गरम झालेल्या तेलात जिरे, तमालपत्र आणि लाल मिरच्या घाला.
२) त्यानंतर आलं-लसूण पेस्ट टाकून गरम करून घ्या. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकून ब्राऊन रंग प्राप्त होईपर्यंत तेलात परतून घ्या.
३) कांदा परतल्यानंतर त्यात टोमॅटो प्यूरीदेखील हलकेपणा परतवा. जेव्हा पेस्ट तेलापासून बाजूला होईल तेव्हा खिमा टाका आणि ५ मिनिटं मध्यम आचेवर शिजवून घ्या.
४) त्यानंतर एक पाणी टाका आणि कढईवर झाकण ठेवून पुन्हा ५ मिनिटं शिजवून घ्या. जेव्हा खिमा तेलापासून बाजूल होताना दिसेल तेव्हा मटर आणि शिजवलेली अंडी घाला.
५) नंतर हे सर्व पदार्थ किमान ७ मिनिटं शिजवून घ्या. हे शिजत असताना मधेमधे चमचा घालून मटर शिजले की नाहीत, पाहून घ्या.
६) जेव्हा कढईतील ग्रेव्ही घट्ट होऊ लागेल तेव्हा गॅस बंद करा आणि त्यात गरम मसाला, कोथिंबीर मिक्स करून घ्या.
अशाप्रकारे तुमची चरचरीत अंडा-खिमाकरी तयार झाली. ही गरमा-गरम अंडा-खिमाकरी तंदूर रोटी किंवा जिरा राईसबरोबर खाऊ शकता.