Imran Khan : इम्रान खान यांना धक्का, निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास कोर्टाचा नकार

Imran Khan : इम्रान खान यांना धक्का, निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास कोर्टाचा नकार

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना मालमत्ता लपवल्याबद्दल त्यांना दोषी ठरविण्यात आले आहे. त्यानंतर त्यांची खासदार म्हणून अपात्र ठरवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला तत्काळ स्थगिती देण्याची विनंती इस्लामाबाद उच्च न्यायालयाने फेटाळली.

दरम्यान, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अथर मिनाल्लाह यांनी इम्रान खान (Imran Khan) यांना पुन्हा अपील दाखल करण्यासाठी आणि त्यानंतर आदेशाला स्थगिती मागण्यासाठी तीन दिवसांचा अवधी दिला आहे. तसेच खान यांनी संपूर्ण कागदपत्रांसह अपील दाखल करावे, अशा सुचना न्यायाधीशांनी दिल्या. ताबडतोब आदेश स्थगित करण्याची गरज नाही. कारण त्यांची अपात्रता संसदेतील सध्याच्या कार्यकाळात समाविष्ट आहे. आणि यामुळे त्यांना भविष्यातील निवडणुका लढवण्यास प्रतिबंध होत नाही, असेही न्यायाधीशांनी म्हटले आहे.

तर शुक्रवारी दिलेल्या निर्णयानंतर आयोगाने अद्याप आपला संपूर्ण निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे अपात्रतेच्या मुदतीबाबत गोंधळ निर्माण झाला आहे, असे खान यांच्या पक्षाचे प्रवक्ते फवाद चौधरी यांनी म्हटले आहे. दरम्यान, खान यांनी विविध परदेशी मान्यवरांकडून मिळालेल्या भेटवस्तू विकून पैसे कमावले. हा व्‍यवहार लपवणे बेकायदेशीर आहे. पाकिस्‍तानी कायदा अशा भेटवस्‍तूंची विक्री करण्‍यास प्रतिबंध करू शकत नाही. परंतु निवडणूक आयोगाला खोटी माहिती दिल्याबद्दल सरकार खान यांच्यावर फौजदारी खटला दाखल करू शकते, असे मत निवडणूक आयोगाच्या पाच सदस्यीय पॅनेलने शुक्रवारी व्यक्त केले होते.

कायदा मंत्री आझम नजीर तरार म्हणाले की, खान यांना पाच वर्षांसाठी निवडणुकीत भाग घेण्यास अपात्र ठरवले जाईल. फौजदारी खटल्यात दोषी आढळल्यास तुरुंगवासाची शिक्षा होते. आणि खान यांना राजकारणात भाग घेण्यापासून किंवा कोणतेही सार्वजनिक पद धारण करण्यापासून रोखता येते.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news