

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पोटनिवडणुकीत विरोधी पक्षांना धक्का दिला आहे. त्यांच्या तेहरिक -ए-इन्साफ ( पीटीआय ) या पक्षाने नॅशनल असेंब्लीच्या पोटनिवडणुकीतील आठ जागांपैकी सहा जागांवर विजय मिळवला आहे. ( Pakistan by-elections ) एप्रिल २०२२ मध्ये पाकिस्तान संसदेत इम्रान खान यांच्यावर अविश्वास ठराव मांडण्यात आला होते. त्यांना पंतप्रधान पदावरुन पायउतार व्हावे लागले होते. यानंतर त्यांनी देशभर जाहीर सभा घेत आपल्या पक्षाची भूमिका मांडली होती. मतदारांनी याला प्रतिसाद देत पुन्हा त्यांच्या पक्षावर विश्वास व्यक्त केला आहे.
पोटनिवडणुकीत इम्रान खान यांच्या पक्षाने सात जागा लढवल्या होत्या. त्यापैकी जागा जागा ते जिंकले आहेत. यामध्ये पेशावर आणि मर्दान आणि काहनेवालच्या प्रांतीय असेंब्लीच्या जागांचा समावेश आहे. मात्र मुलतानच्या येथील प्रतिष्ठेच्या जागेवर मात्र त्यांच्या पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुलतान मतदारसंघात पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री शाह मोशमोद कुरेशी यांची कन्या मेहर बानो कुरेशी यांना माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी पराभूत केले आहे.
पाकिस्तानातील सत्ताधारी पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझला केवळ एक जागेवर समाधान मानावे लागले आहे. पोटनिवडणुकीत विविध राजकीय पक्षांचे आणि अपक्षांचे असे एकूण 101 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये पंजाबमधील 52, सिंधमधील 33 आणि खैबर पख्तूनख्वामधील16 उमेदवारांचा समावेश होता.
एप्रिल २०२२ मध्ये इम्रान खान यांच्या अविश्वास ठराव मांडण्यात आला होता. यानंतर पंतप्रधान पदावरुन पायउतार व्हावे लागले होते. यानंतर त्यांनी देशभर जाहीर सभा घेत आपल्या पक्षाची भूमिका मांडली होती. आता पोटनिवडणुकीत त्यांच्या पक्षाला मिळालेल्या यशामुळे इम्रान खान यांना दिलासा मिळाला आहे. जुलैमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत इम्रान खान यांच्या पक्षाने पंजाब विधानसभेच्या २० पैकी १५ जागा जिंकल्या होत्या.