नोकरी नाही, हे पोटगीस नकार देण्याचे कारण होऊ शकत नाही : कर्नाटक उच्च न्यायालय

file photo
file photo

बंगळूर : नोकरी गमावली हे पोटगीला नकार देण्याचे कारण होऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणातील जोडप्याचे लग्न 2 मार्च 2020 रोजी झाले होते. नंतर त्यांच्यात काही कारणांवरून वादावादी होऊ लागली. त्यामुळे पत्नीने न्यायालयात धाव घेऊन पतीकडून आपल्याला पोटगी मिळावी, अशी मागणी केली.

त्यावर दरमहा दहा हजार रुपये पोटगीची रक्कम निश्चित करण्यात आली. तथापि, पतीने आपण बेरोजगार असून, आपली नोकरीही गेल्याचा युक्तिवाद केला आणि पोटगी देण्याचे नाकारले. सध्याच्या परिस्थितीत आपल्याला पोटगी देणे शक्य नसल्याचेही त्याने सांगितले. त्यावर न्यायालयाने कडक शब्दांत त्याची खरडपट्टी काढली. एखाद्या धडधाकट व्यक्तीने अशी सबब पुढे करणे चुकीचे आहे, असे सांगून पतीने ठरलेली रक्कम पत्नीला द्यावी, असा आदेश न्यायालयाने दिला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news