nirmala sitharaman
nirmala sitharaman

Budget 2023-24 Health : महत्वाची घोषणा : 2047 पर्यंत ॲनिमिया मुक्त भारताचा संकल्प

पुढारी ऑनलाइन डेस्क : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा 2023-24 साठीचा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली आहे. मोदी सरकारच्या दुस-या टर्ममधील हे शेवटचे पूर्ण बजेट असणार आहे. अर्थसंकल्पात 2047 पर्यंत ॲनिमिया मुक्त भारत करण्याचा संकल्प केला आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले, 2047 पर्यंत सिकलसेल ॲनिमिया दूर करण्याचे अभियान या वर्षी सुरू केले जाईल. त्या पुढे म्हणाल्या की या कार्यक्रमात "जागरूकता निर्माण करणे, बाधित आदिवासी भागात 0-40 वर्षे वयोगटातील 7 कोटी लोकांची सार्वत्रिक तपासणी" आणि केंद्रीय मंत्रालये आणि राज्य सरकारांच्या सहयोगी प्रयत्नांद्वारे समुपदेशन सत्रे होतील.

या व्यतिरिक्त 2013-14 पासून 157 मेडिकल कॉलेजची उभारणी झाली आहे तर या वर्षीच्या अर्थसंकल्पात 157 नर्सिंग कॉलेजची उभारणी करण्याचा संकल्प सादर केला आहे.

हे ही वाचा :

logo
Pudhari News
pudhari.news