कोल्हापूर : रमेश देव यांच्या अस्थींचे प्रयाग संगमावर विसर्जन

कोल्हापूर : रमेश देव यांच्या अस्थींचे प्रयाग संगमावर विसर्जन
Published on
Updated on

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा; ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या अस्थींचे करवीर तालुक्यातील प्रयाग संगमावर रविवारी विसर्जन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, देव यांचे सुपुत्र अजिंक्य व अभिनय, आरती देव, आर्या देव हे उपस्थित होते. आपले बालपण पंचगंगेच्या काठावर गेले आहे. त्यामुळे माझ्या अस्थींचे पंचगंगेत विसर्जन करावे, अशी इच्छा वडिलांनी बोलून दाखविली होती.

ती पूर्ण करण्यासाठी आम्ही देव परिवार प्रयाग संगमावर आलो आहे, असे अजिंक्य देव यांनी सांगितले. कोल्हापूरवासीयांनी देव परिवारावरील प्रेम आमच्या मुलांवरही कायम ठेवावे, अशी अपेक्षाही अजिंक्य देव यांनी व्यक्त केली. यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे व्यवस्थापक रवींद्र बोरगावकर, मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचलतं का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news