IMD Weather Forecast: सोमवार ६ मे पर्यंत भारतात उष्णतेच्या लाटेचा इशारा; IMDची माहिती

Heatwave Alert:उष्णतेची लाट
Heatwave Alert:उष्णतेची लाट

पुढारी ऑनलाईन डेस्क: पूर्व भारतात रविवार ५ मे पर्यंत आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारतात सोमवार ६ मे पर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. या संदर्भात माहिती हवामान विभागाने एक्स पोस्ट वरून दिली आहे.
दरम्यान रविवार (दि.५ मे) आणि सोमवार (दि.६ मे) या दोन दिवस ईशान्य भारतात गडगडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाजही भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. (IMD Weather Forecast)

रविवार ५ मे पर्यंत पश्चिम बंगालमधील गंगा नदीचे खोरे, आंध्र प्रदेशची किनारपट्टी, बिहार, ओडिशा, कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्राचा काही भाग आणि तामिळनाडूत उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. तर पुढील पाच दिवस सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, चंदीगड, दिल्ली, उत्तराखंड, हरियाणा, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (IMD Weather Forecast)

IMD हवामान अंदाज: भारतातील 'या' भागात उष्णतेच्या लाटेचा अंदाज

– गंगेच्या पश्चिम बंगाल आणि बिहारच्या काही भागांमध्ये आज शुक्रवार ३ मे ते रविवार ५ मे दरम्यान उष्णतेची लाट ते तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
– तेलंगणा, कर्नाटक, किनारी आंध्र आणि यानम, गुजरात आणि ओडिशामध्ये पुढील ४ दिवसांत उष्णतेच्या लाटेची स्थिती
– शुक्रवार ३ मे आणि शनिवार ४ मे रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात उष्णतेच्या लाटेचा अंदाज
-शनिवारी ४ मे आणि रविवारी ५ मे रोजी विदर्भ आणि शुक्रवार ३ मे ते शनिवार ४ मे या कालावधीत तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये आणि आठवड्याच्या शेवटी दक्षिण राजस्थानमध्ये उष्मतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news