‘बुर्ज खलिफा’वर झळकली श्रीरामाची प्रतिमा

‘बुर्ज खलिफा’वर झळकली श्रीरामाची प्रतिमा

दुबई : संयुक्त अरब अमिरातीच्या दुबई नगरीतील 'बुर्ज खलिफा' या इमारतीची ओळख 'जगातील सर्वात उंच इमारत' अशी आहे. या भव्य, उत्तुंग इमारतीवर अनेक वेळा विशिष्ट प्रतिमा झळकवल्या जात असतात. सोमवारी अयोध्येत श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात झाला व अवघ्या जगाने तो पाहिला. त्यानंतर आता मंगळवारी पहाटे 'बुर्ज खलिफा'वर भगवान श्रीरामाची प्रतिमा झळकवण्यात आली.

रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा उत्साह भारतासह अनेक देशांमध्ये पाहायला मिळाला होता. अमेरिकेत प्रसिद्ध टाईम्स स्क्वेअरवरही लोकांनी गर्दी केली होती. तिथेही श्रीरामाच्या उत्तुंग प्रतिमा झळकवल्या गेल्या. तसेच अयोध्येतील भव्य राममंदिराचे थ्री-डी पोस्टरही झळकवले गेले. 'ओव्हरसीज फे्ंर डस् ऑफ राम मंदिर'च्या सदस्यांनी टाईम्स स्क्वेअरवर लाडू वाटून आपला आनंद साजरा केला. आता त्यापाठोपाठ दुबईतील बुर्ज खलिफावरही श्रीरामाची प्रतिमा झळकवली गेली. यामध्ये कोदंडधारी श्रीराम दिसून आले. या प्रतिमेच्या वरील भागात 'जय श्री राम' असेही लिहिलेले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news