Ileana D’cruz Delivered A Baby Boy : इलियाना डिक्रूजने दिला मुलाला जन्म; मुलाचा फोटो आणि नाव केले शेअर

Ileana D'cruz Delivered A Baby Boy :
Ileana D'cruz Delivered A Baby Boy :

पुढारी ऑनलाइन डेस्क : Ileana D' Cruz Delivered A Baby Boy: बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूज आई बनली आहे. तिने 1 ऑगस्टला एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. अभिनेत्री इलियानाने तिच्या इन्स्टाग्राम अकांऊंटवरून ही गोड बातमी शेअर केली आहे. सोबतच तिने आपल्या मुलाची एक फोटो शेअर करत त्याचे नाव काय ठेवले आहे हे देखील सांगितले. कोआ फीनिक्स डोलन असे तिने आपल्या मुलाचे नाव ठेवले आहे. फोटोवर मुलाच्या जन्माची तारीख दिली आहे.

फोटो शेअर करत इलियानाने एक सुंदर कॅप्शन दिले आहे. तिने म्हटले आहे की मी माझा आनंद शब्दांत व्यक्त करू शकत नाही. आम्ही आमच्या मुलाचे या जगात स्वागत करून किती आनंदी आहोत…आमचे हृदय आनंदाने भरले आहे, असे इलियानाने म्हटले आहे.

Ileana D'cruz Delivered A Baby Boy : गर्भारपणाचा अनुभव केला होता शेअर

तर काही दिवसांपूर्वी 10 जून रोजी इलियानाने पोस्ट करत बेबी बंपचे फोटो फ्लॉन्ट केले होते. त्यात तिने आपली गर्भारपणाचा अनुभव शेअर केला होता. यावेळी तिने तिच्या पार्टनरची स्तुती केली होती. तिने म्हटले होते की प्रत्येक वेळी तो अवघड प्रसंगांमध्ये त्यांना साथ देतो. ती म्हटली होती गर्भवती असणे हा सर्वात सूंदर आशीर्वाद आहे…मी याचा कधी अनुभव घेईन याबाबत मी कधी विचार केला नव्हता. त्यामुळे गर्भारपणाच्या या प्रवासात स्वतःला नशीबवान मानते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news