IFFCO Nano Urea Plus | शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! द्रवरूप नॅनो युरिया प्लस ३ वर्षांसाठी अधिसूचित, जाणून घ्या किंमत

IFFCO Nano Urea Plus | शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! द्रवरूप नॅनो युरिया प्लस ३ वर्षांसाठी अधिसूचित, जाणून घ्या किंमत
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने 'इफ्को'चा द्रवरूप नॅनो युरिया प्लस (लिक्विड) ३ वर्षांच्या कालावधीसाठी अधिसूचित केला आहे. याबाबतची घोषणा इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को- ऑपरेटिव्ह लिमिटेड (इफ्को) ने केली आहे. इफ्को नॅनो यूरिया प्लस हे नॅनो युरियाचे प्रगत सूत्रीकरण आहे. ज्याने पिकांच्या वाढीच्या टप्प्यावर नायट्रोजनची नव्याने आवश्यकता पूर्ण केल्याचे सिद्ध झाले आहे. याचा वापर पारंपारिक युरिया आणि इतर नायट्रोजनयुक्त खतांच्या ऐवजी केला जाईल, असे IFFCO चे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ डॉ. यू. एस. अवस्थी यांनी सांगितले. (IFFCO Nano Urea Plus)

द्रवरूप नॅनो युरिया प्लसमुळे मातीचे आरोग्य चांगले राहते. तसेच शेतकऱ्यांच्या नफा आणि शाश्वत पर्यावरण हे याचे उद्दिष्ट आहे. हे सूक्ष्म पोषक घटकांची उपलब्धता आणि कार्यक्षमतादेखील वाढवते. हे क्लोरोफिल चार्जर, उत्पन्न वाढवणारे आणि क्लायमेट स्मार्ट फार्मिंगसाठी मदत करते. इफ्कोने नॅनो युरिया प्लसची वाढीव किंमत ठेवलेली नाही. याची केवळ प्रति ५०० मिलीलीटर बाटली २२५ रुपयांना उपलब्ध आहे, डॉ. अवस्थी यांनी म्हटले आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे, आता शेतकऱ्यांनी देशभरात नॅनो युरिया वापरण्यास सुरुवात केली आहे. युरियाचे हे सुधारित रुप पर्यावरणाला हानी न पोहोचवता पिकाला एकूण चांगल्या आणि निरोगी वाढीसाठी मदत करेल, असा विश्वास डॉ. अवस्थी यांनी व्यक्त केला आहे.

रोप पोषणाच्या दृष्टीने द्रवरूप नॅनो युरिया अतिशय प्रभावी आहे. त्यामुळे सुधारित पोषक गुणवत्तेसोबत उत्पादनात वाढ होते. तसेच भूगर्भातील पाण्याच्या गुणवत्तेवरही सकारात्मक परिणाम दिसून येतो, असा विश्‍वास इफ्फकोच्या शास्त्रज्ञांना याधी व्यक्त केला होता. (IFFCO Nano Urea Plus)

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news