Britan PM Celection : …असे घडल्यास ऋषि सुनक ब्रिटनचे पंतप्रधान होऊ शकतात!

Britan PM Celection
Britan PM Celection

पुढारी ऑनलाइन डेस्क : Britan PM Celection :  भारतीय वंशाचे ऋषि सुनक यांच्याकडे ब्रिटनचे प्रधानमंत्री होण्यासाठी आणखी एक संधी आहे. जर त्यांचे प्रतिद्वंदी पेनी मॉरडोन्ट 100 सांसदांचा समर्थन मिळवण्यात अयशस्वी झाले तर सुनक ब्रिटनचे पंतप्रधान होऊ शकतात. ऋषि सुनक यांच्याजवळ सध्या 142 सदस्यांचे समर्थन आहे. तर पेनी मॉरडोन्ट यांना आता 29 सदस्यांच समर्थन प्राप्त आहे. तर पूर्व प्रधानमंत्री बोरिस जॉनसन यांनी रविवारी ब्रिटनचे प्रधानमंत्री बनण्याच्या शर्यतीत म्हटले होते त्यांच्याकडे पर्याप्त समर्थन आहे. मात्र, ऋषि सुनक यांच्यापेक्षा ते बरेच मागे आहेत. त्यामुळे ब्रिटनच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत ऋषि सुनक सध्या सर्वात पुढे आहे.

Britan PM Celection : सोमवारी दुपारी दोन वाजेपर्यंत पेनी मॉरडोन्ट यांना 100 सांसदांचे समर्थन मिळवण्यात यश आले नाही. तर ऋषि हे आपोआपच प्रधानमंत्री बनतील. कारण कंजर्वेटि पार्टीच्या नियमानुसार प्रधानमंत्री पदाची दावेदारीसाठी 100 सांसदांचे समर्थन असणे आवश्यक आहे. त्याची मुदत सोमवारी स्थानीय वेळेनुसार दुपारी दोन वाजता संपत आहे. जर एका पेक्षा अधिक उमेदवारांकडे 100 पेक्षा जास्त सांसद असतील तर त्यांच्यामध्ये निवडणूक घेण्यात येईल. शुक्रवारपर्यंत 1 लाख 70 हजार टोरी सदस्य ऑनलाइन माध्यमातून मतदान करतील.

Britan PM Celection :  गेल्या महिन्यात, तत्कालीन ब्रिटीश परराष्ट्र मंत्री लिझ ट्रस यांनी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेतृत्वासाठी झालेल्या स्पर्धेत भारतीय वंशाचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांचा पराभव करून बोरिस जॉन्सन यांची पंतप्रधानपदी निवड केली. त्यानंतर ट्रस यांना 57.4 टक्के आणि सुनक यांना 42.6 टक्के मते मिळाली. मात्र, अल्पावधीतच लिझ ट्रस यांनी राजीनामा दिला. त्यामुळे ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी कंझर्वेटिव्ह पक्षाकडून पुन्हा नवीन सांसद निवडण्यात येणार आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news