Ice-cream : जपानी कंपनीने बनवले जगातील सर्वात महागडे आईस्क्रीम; गिनिज बुकमध्ये नोंदवला विक्रम; काय आहे आईस्क्रीमची खासियत?

Icecream
Icecream
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : Ice-cream : जपानच्या एका कंपनीने जगातील सर्वात महागडे आईस्क्रीम बनवण्याचा विक्रम गिनिज बुकमध्ये नोंदवला आहे. या आइस्क्रीमची किंमत ८ लाख ७३ हजार ४०० जपानी येन इतकी आहे. भारतीय रुपयांत याची किंमत ५.२ लाख रुपये इतकी आहे. असे काय खास आहे या आईस्क्रीममध्ये का आहे इतकी किंमत जाणून घेऊ या सर्व काही…

जपानच्या Cellato आईस्क्रीम ब्रँडने जगातील हे सर्वात महागडे आईस्क्रीम तयार केले आहे. हे आइस्क्रीम विकसित करण्यासाठी या कंपनीला तब्बल दीड वर्ष लागला. या आइसक्रीमला बायकुया असे नाव देण्यात आले आहे. सेलाटोने यासाठी जपानमधील RiVi या रेस्टॉरंटमधील मुख्य शेफ Tadayoshi Yamada तदायोशी यामदा यांना नेमले होते. यामदा हे कल्पनारम्य फ्यूजन पाककृती बनवण्यासाठी ओळखले जातात.

Ice-cream : काय आहेत या आईसक्रीमची वैशिष्ट्ये

या आईस्क्रीममध्ये वापरलेले घटक हे या आईस्क्रीमचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य असून हेच घटक इतक्या अवाढव्य किंमतीसाठी कारणीभूत ठरले. बायकुया नावाचे सर्वात महागडे आइस्क्रीम बनवणे हे सेलाटोचे एकमेव ध्येय नव्हते. त्यांना आइस्क्रीमच्या स्वरूपात युरोपियन आणि जपानी घटक एकत्र करायचे होते.

या आईस्क्रीममध्ये इटलीत उगवणारा दुर्मिळा पांढरा ट्रफल, ज्याची किंमत प्रति किलो २ दशलक्ष जपानी येन इतकी आहे. तर Parmigiano Reggiano आणि sake lees हे आणखी विशिष्ट पदार्थ आहेत.

Ice-cream : ज्यांनी याचा आस्वाद घेतला ते काय म्हणाले?

आईस्क्रीमच्या टेस्टिंग दरम्यान ज्या कर्मचाऱ्यांनी याचा आस्वाद घेतला, त्यांनी या आईस्क्रीमविषयी सांगितले की आईस्क्रीम समोर येताच पांढऱ्या ट्रफलचा मजबूत सुगंध तुम्हाला आकर्षित करतो. नंतर त्यामध्ये पारमिगियानो आणि रेगियानो फळाची चव येते.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news