ICC T20 Rankings : विराट कोहलीचा धमाका! आयसीसी क्रमवारीत मोठी झेप

ICC T20 Rankings : विराट कोहलीचा धमाका! आयसीसी क्रमवारीत मोठी झेप

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया चषक संपल्यानंतर आता आयसीसीने टी-20 फलंदाजीची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. ज्यामध्ये विराट कोहलीला फायदा झाला आहे. कोहलीने अफगाणिस्तानविरुद्ध आशिया चषक स्पर्धेच्या सामन्यात शानदार शतक झळकावले. या शतकी खेळीनंतर कोहलीने आयसीसी टी 20 फलंदाजी क्रमवारीत 14 स्थानांची झेप घेतली आहे. तो 15 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याच वेळी, रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोनच भारतीय आहेत ज्यांचा तिन्ही फॉरमॅटच्या क्रमवारीत टॉप 15 मध्ये समावेश आहे. दुसरीकडे, प्लेअर ऑफ द टूर्नामेंट वनिंदू हसरंगाने टी-20 गोलंदाजांच्या क्रमवारीत तीन स्थानांनी झेप घेत तो सहाव्या क्रमांकावर पोहचला आहे. (ICC T20 Rankings Virat Kohli)

आशिया कपपूर्वी कोहली टी-20 क्रमवारीत 33 व्या क्रमांकावर होता, आता तो 15 व्या स्थानावर आला आहे. कोहलीने क्रमवारीत जबरदस्त पुनरागमन करत सध्या अव्वल स्थानी असलेल्या फलंदाजांसमोर पुन्हा एकदा आव्हान उभे केले आहे. कोहलीने जवळपास तीन वर्षात पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले आणि आशिया कपमध्ये एकूण 276 धावा करण्यात तो यशस्वी ठरला. त्यामुळेच त्याच्या फलंदाजीच्या क्रमवारीत बरीच सुधारणा झाली आहे. (ICC T20 Rankings Virat Kohli)

रिजवान टॉप…

पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान पहिल्या क्रमांकावर कायम आहे, तर बाबर आझमला फटका बसला आहे. दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेच्या अॅडम मार्करामने 792 गुणांसह दुसरे स्थान पटकावले आहे. बाबर आझम तिसऱ्या क्रमांकावर आहे. सूर्यकुमार यादवने चौथ्या क्रमांकावर आपले स्थान कायम ठेवले आहे. डेव्हिड मलान पाचव्या क्रमांकावर आहे, तर अॅरॉन फिंच सहाव्या क्रमांकावर आहे. कॉनवे 7 व्या, श्रीलंकेचा पाथुम निसांका 8 व्या, मोहम्मद वसीम 9व्या तर हेंड्रिक्स 10व्या क्रमांकावर आहेत. (ICC T20 Rankings Virat Kohli)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news