Warner-Marsh: वॉर्नर-मार्शची तोडफोड! हारिस रौफला रडवले, एका षटकात कुटल्या 24 धावा(Video)

Warner-Marsh: वॉर्नर-मार्शची तोडफोड! हारिस रौफला रडवले, एका षटकात कुटल्या 24 धावा(Video)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Warner-Marsh : आयसीसी वनडे वर्ल्डकपच्या 18 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी पाकिस्तानविरुद्ध शानदार सुरुवात केली. दोन्ही फलंदाजांनी पहिल्याच षटकापासून पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांवर आक्रमण केले. विशेषत: पाकिस्तानकडून डावाचे 9 वे षटक टाकण्यासाठी आलेल्या हारिस रौफच्या एका षटकात वॉर्नर आणि मार्शने मिळून षटकार-चौकारांचा पाऊस पाडला.

पाकिस्तानचे गोलंदाज हादरले

शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचा हा निर्णय चुकीचा ठरला. वॉर्नर आणि मार्श यांनी पाकिस्तानी गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला. आपल्या झंझावाती गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या रौफच्या गोलंदाजी तर अक्षरश: पिसेच काढली. ही धुलाई पाहून पाकिस्तानचे बाकीचे गोलंदाज हादरले. रौफने सर्व प्रकारच्या लेन्थवर चेंडू फेकले केली पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. (Warner-Marsh)

रौफच्या पहिल्याच षटकात 24 धावा (Warner-Marsh)

बाबरने रौफला विकेट मिळवण्यासाठी नववे षटक दिले. रौफ आपल्या गतीने दोन्ही फलंदाजांना अडचणीत आणेल आणि संघाला यश मिळवून देईल, अशी कर्णधाराला अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. पहिल्याच चेंडूवर वॉर्नरने चौकार ठोकला. दुसऱ्या चेंडूवर त्याने गुडघ्यावर बसून षटकार खेचला. तिसऱ्या चेंडूवर वॉर्नरने एक धाव घेतली आणि स्ट्राइक रोटेट केले. त्यामुळे मार्श स्ट्राईकवर आला. सलग दोन चेंडूंवर दोन चौकार खाल्ल्यानंतर रौफ भेदरलेला दिसत होता. त्याचा परिणाम असा झाला की त्याने दबावाखाली चौथा चेंडू वाईड टाकला. यानंतर मार्शने पुढच्या तीन चेंडूंवर सलग तीन चौकार लगावले. मार्शनेच्या या झंझावाती खेळीने रौफ रडकुंडीला आल्याचे पहायला मिळाले. त्याच्या या षटकात एकूण 24 धावा आल्या. अशाप्रकारे डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी मिळून हॅरिस रौफच्या त्या षटकात एकूण 24 धावा कुटल्या. रौफ हा जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक मानला जातो पण ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीर फलंदाजांनी त्याला ज्याप्रकारे झोडपले त्याचा त्याने स्वप्नातही विचार केला नसेल.

वॉर्नर-मार्शचे अर्धशतक (Warner-Marsh)

वॉर्नर आणि मार्श यांनी पाकिस्तानी गोलंदाजांना एकही संधी दिली नाही आणि धावा वसूल केल्या. वॉर्नरने 13व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर चौकार मारून 50 धावा पूर्ण केल्या. यासाठी त्याने एकूण 38 चेंडू खेळले. यानंतर मार्शनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. मार्शने 15व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेत आपले अर्धशतक पूर्ण केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news