David Warner’s Storm : 163 धावा, 14 चौकार-9 षटकार! वॉर्नरच्या विक्रमी दीड शतकाने उडाल्या पाकिस्तानच्या चिंधड्या

David Warner’s Storm : 163 धावा, 14 चौकार-9 षटकार! वॉर्नरच्या विक्रमी दीड शतकाने उडाल्या पाकिस्तानच्या चिंधड्या
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : David Warner's Storm : ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने पाकिस्तानविरुद्धच्या झंझावाती दीड शतकी खेळी साकारून क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली. या खेळी द्वारे त्याने यापूर्वीच्या तीन सामन्यातील अपयशाचा शिक्का पुसून काढला. त्याने तब्बल 163 धावा फटकावल्या. एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये कोणत्याही फलंदाजाने खेळलेली ही सर्वात मोठी खेळी ठरली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही सलामीवीरांनी शतके झळकावण्याची पहिलीच वेळ

वनडे वर्ल्डकपच्या इतिहासात 150 प्लस धावांची खेळी साकरण्याची ही वॉर्नरची तिसरी वेळ आहे. याआधी असा पराक्रम इतर कोणत्याही फलंदाजाने केलेला नाही. पाकिस्तानविरुद्ध कांगारू सलामीवीर फलंदाज वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी शतके झळकावली. एकदिवसीय विश्वचषकाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही सलामीवीरांनी शतके झळकावण्याची ही पहिलीच वेळ आहे. (David Warner's Storm)

वॉर्नरने वनडेमध्ये 7व्यांदा 150 प्लस इनिंग खेळली (David Warner's Storm)

वॉर्नरने 124 चेंडूत 9 षटकार आणि 14 चौकारांच्या मदतीने 163 धावांची शानदार खेळी केली. वनडेमध्‍ये 150 प्लस धावांची खेळी खेळण्‍याची त्याची ही 7वी वेळ आहे. वॉर्नरच्या पुढे, फक्त रोहित शर्मा आहे ज्याने एकदिवसीय फॉरमॅटमध्ये हा पराक्रम 8 वेळा केला आहे तर सचिन तेंडुलकरने 5 वेळा ही कामगिरी केली आहे. सचिनसह ख्रिस गेल आणि विराट कोहलीही संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

वनडेमध्ये सर्वाधिक 150 प्लस इनिंग खेळणारे फलंदाज (David Warner's Storm)

8 : रोहित शर्मा
7 : डेव्हिड वॉर्नर
5 : सचिन तेंडुलकर
5 : ख्रिस गेल
5 – विराट कोहली

वॉर्नरचे पाकिस्तानविरुद्ध चौथे शतक

या सामन्यात डेव्हिड वॉर्नरने पहिला 39 चेंडूत चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर 85 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. वॉर्नरचे हे एकूण एकदिवसीय करिअरमधील 21 वे तर एकट्या पाकिस्तानविरुद्धचे वनडे फॉरमॅटमधील चौथे शतक ठरले. आपल्या 100 धावांच्या खेळीत त्याने 6 षटकार आणि 7 चौकार लगावले. तर 116 चेंडूत षटकार ठोकून 150 धावा पूर्ण केल्या. अखेर तो 163 धावांवर बाद झाला. पाकिस्तानविरुद्धची एकदिवसीय सामन्यातील ही त्याची दुसरी सर्वोत्तम खेळी आहे.

वॉर्नरची पाकविरुद्धची वनडे शतके

130 धावा (119 चेंडू), सिडनी, 2017
179 धावा (128 चेंडू), अॅडलेड, 2017
107 धावा (111 चेंडू), टॉंटन, सीडब्ल्यूसी 2019
163 धावा (124 चेंडू), बंगळूर, 2023

विश्वचषकात सर्वोच्च धावा फटकावणारे ऑस्ट्रेलियन फलंदाज

178 धावा : डेव्हिड वॉर्नर विरुद्ध अफगाणिस्तान, 2015
166 धावा : डेव्हिड वॉर्नर विरुद्ध बांगलादेश, 2019
163 धावा : डेव्हिड वॉर्नर विरुद्ध पाकिस्तान, 2023
158 धावा : मॅथ्यू हेडन विरुद्ध वेस्ट इंडिज, 2007
153 धावा : ॲरॉन फिंच विरुद्ध श्रीलंका, 2019

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news