पुढारी ऑनलाईन : ICC ODI Rankings : आयसीसी एकदिवसीय रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलिया पुन्हा पहिल्या क्रमांकावर झेप घेतले आहे. दक्षिण आफ्रिकेला दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये पराभूत करून कांगारूंनी हे स्थान पटकावले आहे. तर एक गुण गमावल्यामुळे पाकिस्तानने आपले पहिले स्थान गमावले आहे. तर भारत तिसऱ्या स्थानावर आहे.
सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध द. आफ्रिका यांच्यात एकदिवसीय मालिका सुरू आहे. पाच सामन्यांची ही मालिका द. आफ्रिकेत खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिले दोन्ही सामने पाहुण्या ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. शनिवारी झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 123 धावांनी विजय मिळवला. तर पहिला सामना तीन गडी जिंकला होता. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियाला सलग दोन विजयांचा फायदा झाला आहे. हा संघ ताज्या क्रमवारीत ते 121 गुणांसह पहिल्या स्थानावर पोहोचला. तर पाकिस्तान 120 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
गेल्या वर्षी एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाची कामगिरी चढ-उतारांनी भरलेली होती. 2022 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने पहिले स्थान गमावले होते. तर ऑस्ट्रेलियालाही एका सामन्यात झिम्बाब्वेकडून पराभव स्वीकारावा लागला होता. पण आता ऑस्ट्रेलियाने शानदार पुनरागमन करत पुन्हा एकदा पहिले स्थान पटकावले आहे.
ऑस्ट्रेलिया (121 गुण)
पाकिस्तान (120 गुण)
भारत (114 गुण)
न्यूझीलंड (106 गुण)
इंग्लंड (99 गुण)