पुढारी ऑनलाईन डेस्क : T20 World Cup SLvsNAB : टी 20 विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात सर्वात मोठा निकाल लागला. रविवारी झालेल्या पात्रता सामन्यात नामिबियाने आशिया कप विजेत्या दिग्गज श्रीलंका संघाचा 55 धावांनी पराभव केला. नामिबियाने 164 धावांचे लक्ष्य दिले होते. श्रीलंकेचा संपूर्ण संघ 108 धावांत गारद झाला. नामिबियाच्या अष्टपैलू खेळाडूंनी सामन्याचे फासे फिरवले. जॅन फ्रायलिंक आणि जेजे स्मित यांनी 69 धावांची भागीदारी केली. दोघांनीही महत्त्वाच्या प्रसंगी श्रीलंकेच्या तीन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.
या विजयाचा नायक ठरला जेन फ्रायलिंक. त्याने बॅट आणि बॉल दोन्हीसह उत्कृष्ठ कामगिरी केली. संघ अडचणीत असताना त्याने पहिल्यांदा सुरेख फलंदाजीच्या जोरावर 44 धावा फटकावल्या. त्यानंतर गोलंदाजीत कमाल करत श्रीलंकेच्या डावाला सुरुंग लावून दोन विकेट्सही घेतल्या. नामिबियाकडून डेव्हिड विसे, बर्नार्ड शॉल्ट्झ, बेन शिकाँगो आणि जेन क्रिलिंकने यांनीही भेदक मारा करून प्रत्येकी दोन गडी बाद केले.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथम फलंदाजी करताना नामिबियाने श्रीलंकेसमोर 164 धावांचे लक्ष्य ठेवले. खराब सुरुवातीतून सावरलेल्या नामिबियाने शेवटच्या पाच षटकांत 68 धावा केल्या. जेजे स्मित आणि जॅन फ्रीलिंक यांनी शानदार फलंदाजी केली. या सामन्यात नामिबियाने 35 धावांच्या स्कोअरवर तीन विकेट गमावल्या होत्या, परंतु मधल्या फळीतील फलंदाजांनी चमकदार कामगिरी करत संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेले. फ्रीलिंकने सर्वाधिक 44 धावा केल्या आणि 31 धावा केल्या. श्रीलंकेकडून प्रमोद मदुशनने दोन बळी घेतले. इतर सर्व गोलंदाजांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
164 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाची सुरुवात चांगली झाली नाही. सामन्यादरम्यान सलामीवीरांनी निराशा केली. डावाची सुरुवात करताना पथुम निसांका आणि कुसल मेंडिस यांनी अनुक्रमे 9 आणि 6 धावा केल्या. याशिवाय स्टार फलंदाज दानुष्का गुणातिलका आणि प्रमोद मदुशन हे बेन शिकोंगोच्या चेंडूवर खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतले. भानुका राजपक्षेलाही संघासाठी केवळ 20 धावा करता आल्या.
संघाचा स्टार फिरकी गोलंदाज वानिंदू हसरंगा 4 धावा करून बाद झाला आणि कर्णधार दासून शांकाने 29 धावा केल्या. दुष्मंता चमिराही संघासाठी केवळ 8 धावांचे योगदान देऊ शकला. मात्र, महिष थिक्षाना 11 धावांवर नाबाद राहिला. या कामगिरीनंतर संघाला 19 षटकांत 108 धावा करता आल्या. त्यामुळे त्यांना टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात 55 धावांनी लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला.
नामिबियाच्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. एरार्ड इरास्मस हा एकमेव गोलंदाज होता जो संघासाठी एकही बळी मिळवू शकला नाही. याशिवाय सर्व गोलंदाजांनी विकेट घेतल्या. संघाकडून जेजे स्मित, बर्नार्ड स्कोल्ट्झ, बेन शिकोंगो, डेव्हिड व्हिसा आणि यान फ्रीलिंक यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. नामिबियाच्या गोलंदाजांनी श्रीलंकन संघाच्या सर्व फलंदाजांना 19 षटकांत पॅव्हेलियनमध्ये परतवले.
श्रीलंका संघ :
पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), धनंजया डी सिल्वा, धनुष्का गुनाथिलका, भानुका राजपक्षे, दासुन शानाका (कर्णधार), वनिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमिरा, दिलशान मदुशंका, महेश थेक्षना.
स्टीफन बार्ड, डेव्हिड विसे, गेर्हार्ड इरास्मस (कर्णधार), जॉन निकोल लॉफ्टी-ईटन, जेजे स्मित, जॉन फ्रीलिंक, जेन ग्रीन (विकेटकीपर), दिवान ला कॉक, मायकेल व्हॅन लिंजेन, बर्नार्ड शॉल्ट्ज, बेन शिकोंगो.