Datt Jayanti : श्रीक्षेत्र नारायणपूर येथे जयघोषात श्रीदत्तजन्म सोहळा

Datt Jayanti : श्रीक्षेत्र नारायणपूर येथे जयघोषात श्रीदत्तजन्म सोहळा
Published on
Updated on

सासवड : पुढारी वृत्तसेवा :  श्रीक्षेत्र नारायणपूर (ता. पुरंदर) येथे सोमवारी (दि. 25) श्रीदत्तजन्म सोहळा सायंकाळी 7 वाजून 3 मिनिटांनी मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी 'दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा'च्या जयघोषात अनेक राज्यांतील भाविकांनी फुलांची उधळण केली. तसेच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. सोमवारी पहाटे दत्त मंदिर व नारायणेश्वर (महादेव) मंदिरात देवांना रुद्राभिषेक करण्यात आला. दुपारी 12 ते 5 वाजेपर्यंत बारामती, आढेगाव, वडजिरे, पारनेर, संगमनेर, मुंबई, विनायकनगर, सिपोटे, भोर, अलिबाग, इस्लामपूर, रायरेश्वर, कात्रज, चिंचोली, गिरणार पर्वत, हंगेवाडी, श्रीगोंदा आदी भागांतून आलेल्या 30 दिंड्या मंदिरात घेण्यात आल्या. पोपट महाराज (स्वामी) यांच्या हस्ते दिंडीप्रमुखांचे श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. दत्तजन्म सोहळा 7 वाजून 3 मिनिटांनी मोठ्या उत्साहात पार पडला. या श्री दत्त जयंती सोहळ्यासाठी अनेक राज्यांतून लाखो भाविकांनी हजेरी लावली आणि दत्तजन्मावेळी पोपट महाराज (स्वामी) यांचे आख्यान झाले. नाव ठेवणे, पाळणा, पुष्पवृष्टी, देव भेटवणे, सुंठवडा वाटप आदी कार्यक्रम झाले, अशी माहिती मंदिराचे व्यवस्थापक भरतनाना क्षीरसागर यांनी दिली.

या वेळी मध्य प्रदेशचे वीरेंद्र जैन, विश्व हिंदू परिषदेचे प्रचारप्रमुख दादा वेदक, आमदार संजय जगताप, माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे, माजी आमदार उल्हास पवार, डॉ. उमेश डोंगरे, प्रांताधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, पोलिस निरीक्षक संतोष जाधव, कर्नल जयप्रकाश मिसाळ, तात्यासाहेब भिंताडे, बबन टकले, प्रदीप बोरकर, रामभाऊ बोरकर, चंद्रकांत बोरकर, प्रशांत पाटणे, दादा भुजबळ, दिगंबर भिंताडे आदी उपस्थित होते. या सोहळ्यासाठी तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तराखंड, कोलकाता, कन्याकुमारी, राजस्थान येथील भाविक उपस्थित होते.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news