Dutee Chand : ‘मी माझी जोडीदार मोनालिसा हिच्याशी विवाह करण्यास उत्सुक होते’, न्यायालयाच्या निर्णयावर धावपटूची प्रतिक्रिया

Dutee Chand
Dutee Chand

पुढारी ऑनलाईन डेस्क : समलिंगी विवाहाबाबत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (दि.१८) निकाल जाहिर केला. समलिंगी विवाहांना मान्यता देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. शिवाय, मुले दत्तक घेण्याचा अधिकारही न्यायालयाने अमान्य केला आहे. समलिंगी विवाहांबाबतचा हा निर्णय पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने घेतला आहे. कायदेशीर तांत्रिकता आणि न्यायिक कायद्याच्या चिंतेवर हा निकाल आधारित असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. (Dutee Chand)

समलिंगी विवाह करण्यास आतूर असलेले अनेकजण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट पाहत होते. भारतीय धावपटू दुती चंद त्यापैकी एक होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालानंतर भारतीय धावपटू दुती चंद नाखूश आहे. नाराजी व्यक्ती करताना म्हणाली, समलैंगिक विवाह कायदेशीर होण्यासाठी कायदा संमत होईल, अशी आशा होती. (Dutee Chand)

"मी माझी जोडीदार मोनालिसा हिच्याशी विवाह करण्यास उत्सुक होते. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने पुढील सर्व योजना बिघडल्या आहेत. मी पाच वर्षांपासून मोनालिसासोबत राहत आहे. आम्ही एकत्र आनंदी आहोत आणि प्रौढ म्हणून, आम्हाला स्वतःचे निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. आम्हाला आशा आहे की, संसद समलिंगी विवाहांना परवानगी देणारा कायदा संमत करेल," असे दुती हिने म्हटले आहे. दुतीचे पालक समलिंगी विवाहांच्या विरोधात आहेत. त्यांनी मात्र, सर्वोच्च न्यायालयाचे निकालाचे स्वागत केले आहे. (Dutee Chand)

दुती पुढे बोलताना म्हणाली, "आम्ही कोणावरही आमच्याशी संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करत नाहीत. आम्ही ते आमच्या मर्जीने करतो. मला वाटते की आम्हालाही आमच्या आवडीनुसार जीवन जगण्याची परवानगी दिली पाहिजे. अनेक देशांनी समलिंगी विवाहाला मान्यता दिली आहे, भारतात ते कायदेशीर करण्यात काय अडचण आहे?", असा सवालही तिने केला आहे. (Dutee Chand)

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news