चाेराच्‍या उलट्या बाेंबा…कागदावर लिहलं, ‘मी काहीही…’

चाेराच्‍या उलट्या बाेंबा…कागदावर लिहलं, ‘मी काहीही…’

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : चाेराच्‍या उलट्या बाेंबा , अशी म्‍हण आपल्‍याकडे प्रचलित आहे. आता ही म्‍हण काेण कशासाठी वापरेल? याचा नेम नाही;पण या म्‍हणीचा प्रत्‍यक्ष अनुभव नागपूरमधील हुडकेश्‍वर भागातील एका कुटुंबाने घेतला.

चाेराच्‍या उलट्या बाेंबा : तीन हजार रुपयांवर डल्‍ला

त्‍याच असं झालं, नागपूर शहरातील हुडकेश्वर भागात एका चोरट्याने कुलूप बंद घरात चोरीचा करण्याचा बेत आखला. दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री त्याने कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरात तीन हजार रुपयांच्या व्यतिरिक्त काहीही किंमती ऐवज त्याच्या हाती लागला नाही. त्यामुळे ताे बिथरला. त्‍याने  एका कागदावर 'मी काहीही चोरलेले नाही, भिकारी' असा मजकूर लिहून ताे पसार झाला.

संबंधित कुटुंब नागपूरला परतले. त्यांना घराचा मुख्य दरवाजा तोडलेला आणि घरातल्या सर्व वस्तू विखुरलेल्या अवस्थेत आढळल्या. घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्या कुटुंबाने चोरट्यांनी घरातून काय चोरून नेले आहे का, याचा अंदाज घेतला. चोरट्याने घरातल्या कपाटामध्ये ठेवलेले तीन हजार रुपये नेल्याचं लक्षात आले.

याच शोध मोहिमेत कुटुंबाला चोरट्याने लिहून ठेवलेली चिठ्ठी आढळली. 'मी काहीही चोरले नाही, भिकारी…' हे शब्द त्या चिठ्ठीवर वाचल्यानंतर आपण चोराच्या प्रामाणिकपणावर हसावे की रडावे, हेच त्या कुटुंबाला समजले नाही. कुटुंबाने पोलिसांकडे तक्रार केली. याप्रकरणी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घरातील तीन हजार रुपयांवर डल्‍ला मारुन चिठ्‍ठी लिहित घरमालकाला शहाणपण शिवकणार्‍या या चाेरट्याच्‍या मुसक्‍या आवळण्‍याचे आव्‍हान नागपूर पाेलिसांसमाेर आहे.

हेही वाचलंत का ?

पाहा व्‍हिडीओ :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news