नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क
राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर आता शरद पवार यांची पहिलीच सभा छगन भुजबळ यांच्या मतदार संघात अर्थात येवला तालुक्यात होणार आहे. त्यासाठी आज शरद पवार नाशिकमध्ये आले आहेत.
ना टायर्ड हूॅं, ना रिटायर्ड हूॅं अशा शब्दात वय झाले असल्याच्या टिकेवर शरद पवार यांनी आज प्रत्युत्तर दिले. शरद पवार नाशिकमध्ये असून त्यांची छगन भुजबळ यांच्या येवला मतदार संघात आज सभा आहे. सभेआधी नाशिकमध्ये पवारांनी पत्रकारपरिषद घेत संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
अजित पवार यांनी शरद पवार यांचे वय झाले आहे, त्यांनी आता थांबायला हवे अशी टीका आपल्या भाषणात केली होती. यावेळी अजित पवार तुम्हाला रिटायर्ड व्हायला सांगत आहेत त्यावर काय सांगाल असे विचारले असता, ना टायर्ड हूॅं, ना रिटायर्ड हूॅं,,, मैं तो फायर हूॅं..अशा शब्दात शरद पवारांनी आपल्यावरील टिकेला प्रत्युत्तर दिले. पवार म्हणाले, मंत्रिमंडळातील अनेकांचे वय 70 पेक्षा अधिक आहे. प्रकृती चांगली असली तर कामे करायला अडचण येत नाही. मोरारजी देसाई यांचे वय जास्त असतांना ते देखील अधिक जोमाने काम करायचे असे पवार यावेळी म्हणाले.
स्वातंत्र्याच्या चळवळीत नाशिकसह येवल्याचे योगदान होते. नाशिकला मोठा इतिहास आहे. त्यामुळे येवल्यातून या महाराष्ट्र दौ-याला सुरुवात केली असल्याचे पवार यावेळी म्हणाले. या पत्रकारपरिषदेनंतर पवार येवला येथे रवाना होणार आहेत.