Kangana Ranaut : मी हिंदू असल्याचा अभिमान! ‘बीफ’ खाण्यावरून अफवांवर कंगना राणौतचा पलटवार

कंगना राणौत
कंगना राणौत

पुढारी ऑनलाईन डेस्क : बीफ खाण्यावरून सुरु जालेल्या वादावर हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पार्टी (BJP) ची उमेदवार कंगना राणौतचे स्टेटमेंट समोर आले आहे. (Kangana Ranaut) कंगना म्हणाली की, "ती बीफ वा रेड मीट खात नाही." तिच्याविषयी अफवाह पसरवल्या जात असल्याचे कंगना म्हणाली. (Kangana Ranaut)

काय म्हणाली कंगना?

मी बीफ वा कोणत्याही प्रकारचे रेड मीट खात नाही. हे खूप लज्जास्पद आहे की, माझ्याबद्दल कोणत्याही आधारशिवाय़ अशा प्रकारची अफवा पसरवली जात आहे. मी अनेक दशके योगिक आणि आयुर्वेदिक जीवनशैली स्वीकारली आहे. आणि त्याचा प्रसारदेखील करते. म्हणूनच माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न अजिबात काम करणार नाही. लोकांना चांगल्या प्रकारे माहितीये की, मी एक हिंदू आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. कुणीही दिशाभूल करू शकत नाही.

कंगनाने सोमवारी सकाळी एक ट्विट केलं, त्यामध्ये तिने बीफ खाण्यावरून पसरलेल्या बातम्या अफवा असल्याचे म्हटले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news