Hyundai New SUV : ह्युंदाईच्या ‘या’ नवीन एसयुव्ही कारचे फोटो व्हायरल; लवकरच होणार लॉन्च

Hyundai New SUV : ह्युंदाईच्या ‘या’ नवीन एसयुव्ही कारचे फोटो व्हायरल; लवकरच होणार लॉन्च
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : नुकत्याच काही दिवसांपूर्वी मारुती सुझुकीने फॉक्सकॉन ही नवी एसयुव्ही कार लॉन्च केली. आता यापाठोपाठ ह्युंदाई ही अग्रगण्य कार कंपनी देखील त्यांची नवी एसयुव्ही कार लॉन्च करणार आहे. त्यामुळे कार चाहत्यांसाठी आता खूप दिवसांनंतर आता भारतीय बाजारपेठेत नवे कार मॉडेल पहायला मिळणार आहे. ह्युंदाई कंपनीच्या या नव्या एसयुव्हीची अतुरता कार चाहत्यांना लागून राहिली आहे. (Hyundai New SUV)

मूळची साऊथ कोरिया येथील ह्युंदाई ही भारतातील प्रसिद्ध कार कंपन्यांपैकी एक आहे. येत्या काही दिवसांत ह्युंदाई त्यांची नवी कार लॉन्च करणार आहे. कारच्या नव्या मॉडेलची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असणाऱ्या या नव्या कारचे काही फोटो सोशल मीडियावर लीक झाले आहेत. (Hyundai New SUV)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले फोटो हे ह्युंदाईच्या नव्या एसयुव्ही एक्सटर कारचे आहेत. व्हेन्यू कार पेक्षाही ही नवी कार आकाराने लहान असणार आहे. मात्र या कारचे डिझाइन हे व्हेन्यु कार मॉडेलच्या धरतीवर आधारित असणार आहे. ही नवी एक्सटर कार टाटा कंपनीच्या पंच या प्रसिद्ध कारला प्रतिस्पर्धी असणार आहे. कंपनीने याच्या लॉन्चिंगबाबत कोणतीही माहिती अद्याप दिलेली  नाही. (Hyundai New SUV)

Hyundai च्या नवीन SUV मध्ये एच आकारातील डीआरएल (H-shaped LED DRLs) देण्यात आले आहेत. तसेच हेडलाइट्सचे युनिट वेगळे केले दिसून येत आहे. त्याचबरोबर एलईडी प्रोजेक्ट फिर देखील असल्याची शक्यता आहे. मागील बाजूस, SUV ला एक लहान स्पॉयलर, हाय माउंटेड स्टॉप लॅम्प, डिफॉगर, मागील वायपर, एलईडी टेललाइट्स, बंपर आणि मागील कॅमेरामध्ये रिफ्लेक्टर असण्याची शक्यता आहे. या एसयूव्हीमध्ये 15 ते 17 इंचाचे अलॉय व्हील्सही दिले जाऊ शकतात.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news