स्वतः विहिरीत बुडत असल्याचा नवऱ्याने केला बहाणा; वाचवण्यासाठी आलेल्या पत्नीलाच केस धरून बुडवले

स्वतः विहिरीत बुडत असल्याचा नवऱ्याने केला बहाणा; वाचवण्यासाठी आलेल्या पत्नीलाच केस धरून बुडवले

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा

मांडवी बुद्रुक (ता. हवेली) येथे विहिरीत उतरून आत्महत्येचा बहाणा करणाऱ्या पतीनेच जीव वाचवण्यासाठी आलेल्या पत्नीचाच विहिरीत बुडवून खुन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संगीता संतोष रायरीकर (वय २८) असे मयत महिलेचे नाव आहे.

या प्रकरणी हवेली पोलिसांनी पती संतोष हणुमंत रायरीकर (वय ३०, रा. मांडवी बुद्रुक) यास भादंवी ३०२ कलमाखाली अटक केली आहे. न्यायालयाने त्याला गुरुवार पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी हवेलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम व हवालदार किरण बरकाले तपास करत आहेत.

हा प्रकार सोमवारी २३ मे रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडला. हवेली पोलीसांनी सांगितले की, मांडवी बुद्रुक येथील आडाच्या विहिरीत संतोष रायरीकर याने उडी मारली. त्याने बुडत असल्याचा बहाणा केला. त्यावेळी त्याला वाचवण्यासाठी आलेल्या पत्नी संगिता हिचा हात धरून तिला जोरात ओढुन तिला विहिरीत बुडवले. तिचे केस हाताने व पायाने धरून तिला पाण्यात बुडवुन जीवे ठार मारले. चारित्र्याच्या संशयावरून संतोष याने संगीता हिचा खुन केल्याची तक्रार तिचा भाऊ संदिप भरत यादव (रा. माळवाडी वेळु, ता. भोर) याने दाखल केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news