![हृतिक रोशनची गर्लफ्रेंडसोबत लंडनमध्ये दिवाळी; म्हणून चित्रपट चालत नाही](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F10%2F%E0%A4%B9%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : 'कोई मिल गया', 'गुजारिश' आणि 'जोधा अकबर' यासारख्या चित्रपटातून अभिनयाचा ठसा उमठवणारा बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन पुन्हा चर्चेत आला आहे. गेल्या दिवसांपूर्वी हृतिक रोशन त्याच्यापेक्षा १२ वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्री सबा आझादला डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर पसरली होती. यानंतर दिवाळीच्यानिमित्ताने दोघांचा पुन्हा एकदा एकमेकासोबतचा फोटो व्हायरल झाल्याने रिलेशनशिपची चर्चा जोर धरू लागलीय.
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि सबा आझाद दोघेजण काही महिन्यांपूर्वी मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये स्पॉट झाले आणि तेथून पुढे दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा सोशल मीडियावर पसरली. याच दरम्यान हृतिक आणि सबा दोघेजण विमानतळावर एकमेकांच्या हातात-हात घालून फिरताना, डिनर डेटवर, फॅमिली फंक्शन, गेट-टूगेदर पार्टीत आणि अभिनेता करण जोहरच्या ५० व्या वाढदिवसाच्या पार्टीत दोघेजण हटके अंदाजात दिसले. याच वेळी हृतिकने त्याच्या नात्याचा खुलासा करत एकमेंकांना डेट करत असल्याची माहिती दिली.
यानंतर सध्या पुन्हा एकदा सबाने हृतिकसोबतचा फोटो टविटरवर शेअर करत एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. यात सबा ब्लॅक रंगाचा टुपिसमध्ये तर हृतिक ब्लॅक रंगाचा सफारीमध्ये एकदम ग्लॅमरस दिसला. यासोबतच दोघांनी लंडनमधून एक फोटो शेअर करून चाहत्यांना खास दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटो सबा एका बाकावर बसलेली दिसतेय. तर यावेळी हृतिकने हळूच एक सेल्फी फोटो क्लिक केला आहे. यावेळी हृतिकने रेड आणि व्हाईट रंगाच्या टिशर्टसोबत टोपी परिधान केली आहे. साबाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर हा फोटो शेअर केला असून 'दिवाळीच्या शुभेच्छा'. अशी कॅप्शन लिहिली आहे. हे फोटो सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्याची त्याच्या रिलेशनशिपची चर्चा करण्यास सुरूवात केली आहे. यात एका युजर्सने क्यूटी', ही कोण मुलगी आहे?, 'भूक लागली आहे म्हणून प्लेटमध्ये जेवायला द्या.' ' यामुळे हृतिक रोशनचे चित्रपट चालत नाही'. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत.
हृतिकच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, तो अलीकडेच सैफ अली खान आणि राधिका आपटे यांच्यासोबत 'विक्रम वेधा' या अॅक्शन थ्रिलर चित्रपटात दिसला होता. तर दीपिका पादुकोण आणि अनिल कपूर यांच्यासोबतच्या अॅक्शन थ्रिलर चित्रपट 'फायटर'मध्ये दिसणार आहे. हा चित्रपटात दीपिका आणि हृतिकने पहिला स्क्रीन शेअर केली आहे. तर सबा आझाद गायिका असून तिने आगामी चित्रपट 'सॉन्ग्स ऑफ पॅराडाईज' चे शूटिंग पूर्ण केले आहे.
हेही वाचलंत का?