Diwali Special : दिवाळीच्या मेकअपनंतर अशी घ्या त्वचेची काळजी

Diwali Special : दिवाळीच्या मेकअपनंतर अशी घ्या त्वचेची काळजी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : येत्या काही दिवसांतच दिवाळीला सुरुवात होईल. सगळीकडेच दिवाळीची जोरदार तयारीही सुरू असेल. दिवाळीसाठी कपडे, मिठाई, सजावटीचे सामान विविध वस्तु याची खरेदीही जोरदार सुरू असेल. सजावटीच्या सामानाची, फराळाची चिंता आपण सगळेच करतो. पण एक गोष्ट मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्षली जाते ती म्हणजे त्वचेची काळजी.

ऑक्टोबरच्या उन्हानंतर वातावरणातील कोरडेपणा वाढत जातो. कोरड्या हवेसोबतच अनेक विकारही बळावतात. यासोबतच परिणाम होतो तो त्वचेवर. दिवाळीच्या धामधुमीत मेक अप किंवा पार्लरची मदत घेऊन त्वचा चमकवली जाते. पण त्यानंतर मात्र त्वचेची काळजी आणि पोषण हे पुरेसे होताना दिसत नाही. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत दिवाळीच्या हेवी मेक अप नंतर त्वचेची काळजी कशी घ्यावी.

त्वचेला ब्रेक हवाच !

कळत न कळत आपण त्वचेवर अनेक केमिकल्सचा मारा करत असतो. कार्यक्रम आणि सणांच्या दिवसांत मेक अप वरचेवर केला जातो. अशावेळी एक दिवस नो मेक अप डे नक्कीच ठेवा. बेसिक क्रीम वगळता त्वचेला इतर कोणतही क्रीम लावू नका. यामुळे त्वचेची रंध्रे मोकळी होऊन पूर्वस्थितित येण्यास मदत होते.

मेक अप काढल्यानंतर हे आवर्जून कराच !

मेक अप योग्यप्रकारे उतरवला जाणं गरजेच आहे. त्यानंतर त्वचा पुन्हा एकदा पूर्वस्थितित येण्यासाठी काही स्टेप्स जरूर फॉलो करा. यामध्ये सर्वप्रथम चांगल्या क्लींजरने त्वचा स्वच्छ करा. यानंतर नंबर येतो तो टोनरचा. टोनिंगमुळे त्वचेची छिद्र मोकळी होण्यास मदत होते. यानंतर तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार मॉईश्चरायजरची निवड करा. हलक्या हाताने लावा.

झोप महत्त्वाची…

दिवाळीच्या दिवसांत भेटी – गाठी, कार्यक्रम यामुळे झोपेचे चक्र बिघडते. याचा थेट परिणाम होतो त्वचेवर. पुरेशी विश्रांती नसेल तर त्वचा निस्तेज दिसू लागते. याशिवाय मेक अप च्या माऱ्यामुळे काळवंडू लागते. यासाठी वेळेवर आणि पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे.

शीट मास्क हा चांगला ऑप्शन
शीट मास्क हा त्वचेच्या पोषणाचा सर्वोत्तम पर्याय आहे. हा त्वचेचे स्नायू शिथिल करून आराम मिळवून देण्यास मदत करतो. तसेच अनेकदा त्वचेचा पोत सुधारण्यासही मदत करतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news