पुढारी ऑनलाईन डेस्क : अश्विन मासातील शारदीय नवरात्रोत्सवास आजपासून प्रारंभ झाला आहे. नवरात्रींमध्ये महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली या देवींच्या ९ रुपांची पूजा केला जाते. या नऊ रात्रींमध्ये देवींची आराधणा मनोभावाने भक्तांकडून केली जाते. या अकालबोधन नवरात्र संबोधल्या जाणाऱ्या सणामध्ये भक्त उपवास धरतात. तर आपण उपवासाचे धिरडे (Upvasache Dhirde) कसे करायचे हे पाहू…
साहित्य
१) एक वाटी भगर
२) हिरव्या मिरच्या
३) शेंगदाण्याचा कूट
४) तेल आणि चवीनुसार मीठ
कृती
१) साबुदाणा आणि भगर किमान २ तास भिजवा.
२) दोन तास व्यवस्थित भिजल्यानंतर त्यातील पाणी काढून घ्या.
३) त्यात हिरव्या मिरच्या, जिरे, मीठ आणि शेंगदाण्याचा कूट व्यवस्थित वाटून घ्या.
४) त्यानंतर चवीनुसार मीठ घाला.
५) मंद गॅसवर पॅन ठेवून त्यात तेल घाला. त्यानंतर त्यात बॅटर पसरवून घ्या.
६) एका बाजूने वाफेवर शिजले की परता.
७) अशाप्रकारे उपवासाचे धिरडे (Upvasache Dhirde) तयार झाले. हे धिरडे प्लेटमध्ये घ्या आणि खोबऱ्याच्या चटणीसह खाण्याचा आनंद घ्या.
पहा व्हिडीओ : १० मिनिटात बनवा उपवासाचे फराळी पकोडे
या रेसिपीज वाचल्या का?