मुलांना फटाफट शाळेच्या डब्यासाठी होणारा चिरमुरे पोहा घरच्या घरी करून पाहिला का? टेस्टी आणि पाच मिनिटांच्या आत हा पदार्थ तयार होणारा आहे. सकाळच्या शाळेसाठी हा पदार्थ झटपट बनवता येतो. करायला सोपा आणि सहज आहे. मुले साधे पोहे खात नाहीत. त्यामुळे चिरमुरे पोह्याचा हलका नाश्ता मुलांसाठी करून द्या. भेलपुरी, चिक्कीमध्ये चिरमुरेचा वापर आपण करतोच. चिरमुरे (Chirmure Poha) आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. ऊर्जासाठी चिरमुरे खाणे फायदेशीर आहे. चिरमुरेमध्ये कार्बोहायड्रेट मोठ्या प्रमाणात असतात. जे शरिराच्या ६० ते ७० टक्के ऊर्जेची आवश्यकता पूर्ण करते. चिरमुरेमुळे पचन क्षमता सुधारण्यास मदत होते. डाएटरी फायबरने समृद्ध असल्यामुळे याचे सेवन पचन क्षमता तंदुरुस्त ठेवण्यास मदत करते. डाएटरी फायबरमुळे पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे इतर खाणे होत नाही. याशिवाय गॅस आणि लठ्ठपणाची समस्येतही उपयुक्त ठरते. (Chirmure Poha)
हाडांना मजबूत बनवण्यासाठी चिरमुरेचा उपयोग केला जातो. यामध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियम यासारखे पोषक तत्व असतात. यातील पोषक तत्व हाडांना स्वस्थ आणि मजबूत बनवण्यासाठी महत्त्वाची भूमिका साकारतात. तांदळाच्या चिरमुरेमध्ये कार्बोहाइड्रेट असल्यामुळे त्याचे ग्लूकोजमध्ये रुपांतर होऊन ऊर्जा मिळते. चिरमुरे इम्युनिटी बुस्टचे काम करते. ज्या लोकांची रोग प्रतिकारक क्षमता कमकुवत असते. त्यांच्यासाठी चिरमुऱ्याचे सेवन इम्युनिटी बूस्ट करण्यास लाभदायक होऊ शकतं. व्हिटॅमिन, मिनरल आणि फायटोकेमिकल्सने भरपूर चिरमुरे असतात. फायटोकेमिकल्स रोग प्रतिकारक क्षमतेत सुधारणेचे काम करू शकतात.
[saswp_tiny_recipe recipe_by="स्वालिया शिकलगार" course="नाश्ता" cusine="भारतीय" difficulty="सोपे" servings="५" prepration_time="१०" cooking_time="१०" calories="" image=""
ingradient_name-0="चिरमुरे" ingradient_name-1="टोमॅटो" ingradient_name-2="पाणी" ingradient_name-3="हळद" ingradient_name-4="मीठ" ingradient_name-5="साखर" ingradient_name-6="कडीपत्ता" ingradient_name-7="कच्चे शेंगदाणे" ingradient_name-8="मोहरी" ingradient_name-9="जिरे" ingradient_name-10="कोथिंबीर" ingradient_name-11="तेल" ingradient_name-12="हिरव्या मिरच्या" direction_name-0="प्रथम चिरमुरे पाण्यात भिजवून लगेच काढून घ्यावे." direction_name-1="आता एक कढई घेऊन गॅसवर तापवायला ठेवावी." direction_name-2="त्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल घालावे." direction_name-3="मोहरी, जिऱ्याची फोडणी टाकावी. वरून कच्चे शेंगदाणे घालावे." direction_name-4="हिरव्या मिरच्या, कडीपत्ता, बारीक चिरलेला टोमॅटो घालावा." direction_name-5="थोडी हळद, मीठ, चिमुटभर साखर, हवे असेल्यास लाल तिखट घालावे." direction_name-6="हवे असल्यास चवीसाठी लिंबू पिळावे." notes_name-0="चिरमुरे पाण्यात भिजायला ठेवू नयेत. पाण्यात घातल्यानंतर चिरमुरे पटकन काढून बाजूला एका प्लेटमध्ये ठेवून द्यावेत" html="true"]