Testy Besan Bhindi Recipe : टेस्टी ‘बेसन भेंडीने’ बदला तोंडाची चव

Besan Bhindi Recipe - file photo
Besan Bhindi Recipe - file photo

बेसनपीठ हे हरभरा डाळीपासून बनवलेले असते. खाण्यास पौष्टिक असलेल्या बेसनपीठापासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. (Testy Besan Bhindi Recipe) तिखटपासून गोड पदार्थ बनवता येतात. आज आम्ही बेसन भेंडीची टेस्टी रेसिपी इथे देणार आहोत. जे आरोग्यासाठी उत्तम, पौष्टिक आहे. हरभरामध्ये आयर्न, सोड्यम, फायबर, फॉलिक ॲसिड असते. प्रतिने मुबलक प्रमाणात असतात. ताकदीसाठी हरभऱ्याचे चणे खाल्ले जातात. हरभरामध्ये फायबर्स असल्याने पोट भरल्याची भावना होते. शिवाय बद्धकोष्ठता दूर होण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. हिमोग्लोबीन पातळी वाढवण्यास मदत होते. (Testy Besan Bhindi Recipe)

भेंडीमध्ये प्रथिने, फायबर, कॅल्शियम, खनिजे, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी ६, बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, सोडियम, तांबे, असते. गॅस, आणि अॅसिडिटीची समस्या कमी करते. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी भेंडी मदत करते. पचनक्रिया मजबूत होण्यासाठी भेंडी फायदेशीर आहे.

[saswp_tiny_recipe recipe_by="स्वालिया शिकलगार" course="लंच" cusine="भारतीय" difficulty="सोपे" servings="३" prepration_time="१५" cooking_time="१५" calories="" image="" ingradient_name-0="बेसन पीठ" ingradient_name-1="मीठ" ingradient_name-2="हळद" ingradient_name-3="तेल" ingradient_name-4="पाणी" ingradient_name-5="भेंडी" ingradient_name-6="लिंबू" ingradient_name-7="जिरा पावडर" ingradient_name-8="धने पावडर" ingradient_name-9="हिंग" ingradient_name-10="गरम मसाला" ingradient_name-11="लाल तिखट" direction_name-0="भेंडी धुऊन स्वच्छ कापडाने पुसून घ्या" direction_name-1="आता भेंडी चार भागात उभी कापून घ्या" direction_name-2="दुसरीकडे गॅसवर कढई ठेवून फोडणीसाठी तेल गरम करून घ्या" direction_name-3="एका मोठा भांड्यात कापलेली भेंडी घ्या" direction_name-4="त्यात बेसनपीठ घाला" direction_name-5="त्यामध्ये हळद, गरम मसाला, धने पावडर, जिरे पावडर हिंग टाकून घ्या" direction_name-6="वरून मीठ, लाल तिखट घाला" direction_name-7="अगदी कमी प्रमाणात पाणी टाकून सर्व पदार्थ चांगले हलवून घ्या" direction_name-8="वरून अर्धे लिंबू पिळून घ्या" direction_name-9="गरमागरम बेसन भेंडी भाकरीसोबत खायला घ्या" notes_name-0="" html="true"]

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news