पुढारी ऑनलाईन डेस्क : गणरायाचे आगमन होत आहे. गणपतीच्या आवडीचा नैवेद्य म्हणजे उकडीचे मोदक होय. आपण घरी गव्हाच्या पीठीचे आणि तांदळाच्या पीठाचे उकडीचे मोदक करतो. तांदळाच्या पीठाचे उकडीचे मोदक (Tandalache Ukadi Modak ) करताना खूप काळजी घ्यावी लागते. कारण, तांदळाच्या पीठामध्ये सारण भरताना मोदक तुटतात. तांदळाच्या पीठाचे उकडीचे मोदक तुटू नये म्हणून काय करावे, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Tandalache Ukadi Modak )
[saswp_tiny_recipe recipe_by="स्वालिया शिकलगार" course="" cusine="महाराष्ट्रीयन" difficulty="सोपे" servings="१५" prepration_time="२५" cooking_time="३०" calories="" image="" ingradient_name-0="तांदूळ पीठ" ingradient_name-1="मीठ" ingradient_name-2="गुळ किंवा साखर" ingradient_name-3="वेलदोडे पावडर" ingradient_name-4="पाणी" ingradient_name-5="तुप" ingradient_name-6="ओल्या खोबऱ्याचा किस" direction_name-0="सारण करण्यासाठी ओल्या नारळाचे खोबरे बारीक किसून घ्या" direction_name-1="गुळ किसून घ्या किंवा साखरही घालू शकता" direction_name-2="एक कढई घेऊन गॅसवर तापवत ठेवा, गॅस मंद आचेवर ठेवा" direction_name-3="कढईमध्ये दोन ते तीन चमचे तूप घाला" direction_name-4="त्यात किसलेले खोबरे, गुळ घालून हलवत राहा" direction_name-5="मिश्रण कढईला चिकटणार नाही याची काळजी घ्या" direction_name-6="वरून थोडी वेलदोडे पूड घाला" direction_name-7="जास्त वेळ सारण मिक्स करू नये, नाही तर ते घट्ट होईल" direction_name-8="सारण मऊ असतानाच गॅस बंद करून बाजूला ठेवून द्यावे" direction_name-9="मोदकाचे तांदळाचे पीठ बनवण्यासाठी भांडे गॅसवर तापवून घ्या" direction_name-10="गॅस मंद आचेवर ठेवून त्यात एक कप पाणी घाला" direction_name-11="पाण्यात चवीनुसार मीठ आणि एक चमचा साजूक तूप घाला" direction_name-12="या पाण्याला चांगली उकळ येऊन द्या, गॅस बंद करा" direction_name-13="आता तांदळाचे पीठ गरम पाण्यामध्ये थोडेथोडे घालत हलवून घ्या" direction_name-14="पीठ पटापट मिक्स करून मिश्रण घट्ट होईपर्यंत हलवत राहा" direction_name-15="आता पीठ आणि गरम पाणी एकजीव होईल, शिवाय तुपामुळे पीठ मऊ राहिल, कठीण होणार नाही" direction_name-16="हे मिश्रण किमान २० ते २५ मिनिटे ठेवून द्या" direction_name-17="पीठ जरा गरम गरम असतानाच मळून घ्या" direction_name-18="पीठ आणखी मऊ हवे असेल तर थोडे थोडे गरम पाणी घालून मळून घेऊ शकता" direction_name-19="पीठ चांगले मळून घ्या. यामुळे सारण भरताना मोदक तुटणार नाहीत" direction_name-20="आता मोदक करायला घ्या" direction_name-21="हवा तेवढा पीठाचा गोळा घेऊन पोळपाटावर लाटून घ्या" direction_name-22="त्यात सारण भरा, पाकळ्या गोळा करून हळूहळू दाबून मोदकाचा आकार द्या" direction_name-23="असे १०-१२ मोदक तयार करून घ्या" direction_name-24="आता अर्धे भांडे पाणी घेऊन गॅसवर उकळायला ठेवा" direction_name-25="एका चाळणीला तेल किंवा तुपाचा हात लावून मोदक हळूवार ठेवून द्या" direction_name-26="झाकण ठेवून १५ ते १७ मिनिटे उकडा" direction_name-27="गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी गरमागरम तांदळाच्या पीठाचे उकडी मोदक तयार आहेत" notes_name-0="" html="true"]