पुढारी ऑनलाईन डेस्क : सणासुदीचे दिवस सुरू झाले की, घरामध्ये गोडधोड बनवणं आलंच! दिवाळीच्या सणातील एक स्पेशल रेसिपी म्हणजे गोड शंकरपाळी. खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारी शंकरपाळी कुणाला आवडणार नाही. दिवाळीच्या सणानिमित्त (Diwali Shankarpali ) महाराष्ट्रातील सण दिवाळीनिमित्त बनवला जाणारा खास पदार्थ 'शंकरपाळी'ची रेसिपी आपण पाहणार आहोत. (Diwali Shankarpali )
[saswp_tiny_recipe recipe_by="स्वालिया शिकलगार" course="गोड पदार्थ" cusine="महाराष्ट्रीयन" difficulty="सोपे" servings="२०" prepration_time="२०" cooking_time="३०" calories="" image="" ingradient_name-0="एक किलो मैदा" ingradient_name-1="एक वाटी तूप" ingradient_name-2="दोन वाटी पिठी साखर" ingradient_name-3="तेल" ingradient_name-4="दूध" direction_name-0="मध्यम गॅसवर एका भांड्यात दूध आणि पिठीसाखर विरघळण्यासाठी ठेवा. मिश्रण एकजीव झाले की, गॅस लगेच बंद करा. मिश्रण थंड होऊ द्या." direction_name-1="परातीमध्ये मैदा घ्या आणि गरम केलेले तूप घाला. त्यामुळे शंकरपाळी खुसखुसशीत होते." direction_name-2="मैद्यामध्ये तूप, साखर आणि दूध एकजीव होईपर्यंत व्यवस्थित मळून घ्या. नंतर मळलेल्या पिठाला अर्धा तास बाजूला भिजत ठेवा." direction_name-3="आता त्या पीठाचे छोटे-छोटे एकसारखे गोळे करून पोळी लाटून घ्या. त्यानंतर चिरण्याने एकसारखे काप करून घ्या आणि एका कागदावर काप काढून घ्या." direction_name-4="गॅसवर कढई ठेवून त्यात तेल चांगले गरम करून घ्या. त्यानंतर हलक्या हाताने शंकरपाळीचे काप सोडा. ३-४ मिनिटे ते सोनेरी रंग प्राप्त होईपर्यंत तळून घ्या." direction_name-5="अशाप्रकारे तुमची कुरकुरीत शंकरपाळी तयार झाली. ही शंकरपाळी २०-२५ दिवस चांगली टिकते." notes_name-0="शंकरपाळी खुसखुशीत होण्यासाठी तूप गरम करून घाला" notes_name-1="शंकरपाळी तळून थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात ठेवा, म्हणजे जास्त दिवस टिकून राहिल" html="true"]