International Egg Day : मसालेदार अंडा बिर्याणी सोप्या पद्धतीने कशी बनवावी?

International Egg Day : मसालेदार अंडा बिर्याणी सोप्या पद्धतीने कशी बनवावी?

पुढारी ऑनलाईन डेस्क : मांसाहार आवडणारा एक वर्ग वेगळा असतो. त्यांना रोज मांसाहार दिला तरी ते खातीलच! अशी थोडी मिश्किल थट्टा केली तरी वावगं ठरणार नाही. (International Egg Day) त्यात जर अंड्याचे पदार्थ असेल, तर मग क्या बात है! झणझणीत मसालेदार अंड्यांचे पदार्थ कुणाला आवडणार नाही. रोज केवळ अंडाकरी आणि ऑम्लेट खाऊन कंटाळा आला असेल तर अगदी सोप्या पद्धतीने मसालेदार अंड्याची बिर्याणी करून पाहा. चविष्ट, रुचकर आणि तोंडाला चव आणणारी स्पेशल मसालेदार अंडा बिर्याणीची रेसिपी आम्ही येथे देत आहोत. (International Egg Day)

साहित्य

१) एक वाटी तांदूळ

२) तीन अंडी

३) एक चमचा मीठ

४) चार वेलचीच्या कुड्या

५) उभ्या आकाराचे कापलेले दोन कांदे

६) एक कापलेला टोमॅटो

७) दोन वाटी दही

कृती

१) गॅसवर एका पातेल्यात तांदूळ शिजवत ठेवा, त्यात चवीनुसार मीठ घाला आणि दुसऱ्या गॅसवर एका भांड्यात अंडी शिजवत ठेवा.

२) अंडी शिजल्यानंतर एक कढई गॅसवर ठेवून त्यात ती अंडी तेल, मीठ, तिखट मिक्स करून अंडी फ्राय करून घ्या.

३) त्यानंतर गॅसवर दुसरी कढई ठेवून त्यात तेल किंवा बटर घाला. त्यानंतर त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो, बिर्याणी मसाला, मीठ आणि दही घाला. त्यानंतर पाण्याचा शिंपडा द्या.

४) नंतर त्यात शिजलेला भात आणि फ्राय केलेली अंडी घाला. त्यावर बारीक केलेली कोथिंबीर वरून टाका. गॅस बंद करून बिर्याणीवर झाकण ठेवा आणि १५ मिनिटं ठेवा. त्यानंतर तुमची अंडा बिर्याणी (Egg Biryani) तयार झाली.

पहा व्हिडीओ : खेकड्याची ही भन्नाट रेसीपी एकदा ट्राय कराच

या रेसिपी वाचल्यात का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news