Navratri Fasting : नवरात्रीत उपवासाला बनवा टेस्टी साबुदाणा लापशी

sabudana lapsi file pic
sabudana lapsi file pic

नवरात्रीत जर उपवास करत असाल तर गहू, भात यासारखे अन्नपदार्थ पूर्णपणे वर्जित केले जाते. याकाळात फळे, राजगिरा, खजूर खाल्ले जातात. शाबू पासून बनवलेले पदार्थ जसे की, खिचडी, खीर वगैरे खाल्ले जाते. आज शाबूदाणापासून गोड लापशी कशी बनवायची, जेणेकरून पोट भरेल आणि आरोग्यास फायदेशीर अशी ही लापशी असते. (Navratri Fasting) या उपवासाची दिवशी तुम्ही टेस्टी साबुदाणा लापशी बनवू शकता. ही लापशी म्हणजेच साबुदाण्याची खीर होय. शाबूमध्ये कॅलरी आणि कर्बोदके, फायबरही अधिक असल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळेल. फायबर हे अन्नपचनास उपयुक्त असते. बद्धकोष्ठता, अपचन सुधारण्यासाठीही मदत होते. तुम्हाला वजन वाढवायचे असल्यास साबुदाणा उत्तम उपाय आहे. (Navratri Fasting)

साबुदाण्याचे आरोग्यदायी फायदेदेखील आहेत. यामध्ये भरपूर कॅल्शियम, लोह आणि जीवनसत्व असते. हाडांच्या मजबूतीसाठी हे जीवनसत्व आवश्यक आहे. शाकाहारी लोकांसाठी साबुदाणा उत्तम आहे. पचनास हलका आणि शरीराला ऊर्जा लगेच मिळते. अॅनिमियाच्या रुग्णांसाठी साबुदाणा फायदेशीर आहे.

[saswp_tiny_recipe recipe_by="स्वालिया शिकलगार" course="उपवासाचे पदार्थ" cusine="भारतीय" difficulty="सोपे" servings="५" prepration_time="१५" cooking_time="२०" calories="" image="" ingradient_name-0="साबुदाणा" ingradient_name-1="दूध" ingradient_name-2="साखर" direction_name-0="साबुदाणा थोडावेळ धुऊन ठेवावा" direction_name-1="एका भांड्यात एक पाणी घालून त्यात साबुदाणा शिजवून घ्यावा." direction_name-2="मंद आचेवर साबूदाणा घट्ट होत आल्यानंतर हवे असल्यास त्यात थोडे आणखी पाणी घालावे." direction_name-3="दुसऱ्या भांड्यात दूध उकळून घ्यावे" direction_name-4="उकळ येत असताना त्यात साखर घालावी" direction_name-5="लापशी जरा गोड होण्यासाठी पुरेशी साखर घालून ढवळून घ्यावे." direction_name-6="दुधामध्ये पाण्यात शिजवलेला साबुदाणा घालावा" direction_name-7="काही वेळ शिजवल्यानंतर भांडे खाली उतरावे" direction_name-8="गरम गरम लापशी सर्व्ह करावी" notes_name-0="" html="true"]

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news