Methi Matar Masala Puri : टेस्टी मेथी मटार मसाला पुरी घरी बनवाच

Methi Matar Masala Puri :
Methi Matar Masala Puri :
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : कडक उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. इयत्ता दहावी – बारावीच्या परीक्षा संपल्या की, मुलांना वेध लागतात ते पिकनिकला जायचे. परीक्षा संपल्यानंतर सुट्ट्यांचा हंगाम सुरु होतो. यावेळी वेगवेगळ्या आयडिया येतात. (Methi Matar Masala Puri) गृहिणींना तर आपल्या मुलांसाठी खूप छान छान पदार्थ बनवण्यासाठी तयार असतात. तर कधी- कधी पिकनिकचा प्लॅनेदखील नियोजित होतो. यावेळी मुलांना काहीतरी हटके, चटकदार खाण्यासाठी हवे असते. प्रवासाला जाताना तुम्हाला एक हटके पदार्थ हमखास घेऊन जाता येईल. करायला सोपे आणि खाण्यास चटकदार असा पदार्थ म्हणजे टेस्टी मेथी मटार मसाला पुरी. (Methi Matar Masala Puri)

खास पिकनिकला जाताना पौष्टीक आणि घरच्या घरी बनणारा पदार्थ म्हणजे, चवदार मेंथी मटार मसाला पुरी. या पुऱ्या अनेक दिवस टिकतातही. जाणून घेऊया ही चवदार मेथी मटार मसाला पुरी कशी बनवायची…

साहित्य –

गव्हाचे पीठ – दोन कप

बेसन पीठ- अर्धा कप

रवा- अर्धा कप

हिरवे वटाणा- एक वाटी

हिरव्या मिरची- दोन

जिरे- एक चमचा

तीळ- एक चमचा

आले- एक तुकडा

लसूण- ४-५ तुकडे

हळद- एक चमचा

तिखट- एक चमचा

मीठ- चवीनुसार

धने पावडर- अर्धा चमचा

बारीक चिरलेली मेथी- एक कप

बारीक चिरलेली कोंथिंबीर- अर्धा कप

तेल – तळण्यासाठी

कृती –

१. पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यात हिरवे वाटाणा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, तीळ, जिरे, हिंग, आले आणि लसूण घालून त्याची बारीक पोस्ट तयार करावी. (टिप- आवश्यक असल्यास दोन चमचे पाणी टाकले तरी चालेल.)

२. एका पसरट भांड्यात गव्हाचे पीठ, रवा आणि बेसन पीठ एकत्रित मिक्स करून त्यात तेल गरम करून घालावे.

३. यानंतर मिक्सरमध्ये वाटलेले वाटण, तिखट पावडर, धने पावडर, हळद, बारीक चिरलेली मेथी, कोंथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून मित्रण हाताने मळून घ्यावे. (टिप- लागल्यास पाण्याचा वापर केला तरी चालतो.)

४. चांगल्या प्रकारे हे मिश्रण मळून झाल्यावर भिजण्यासाठी ते १० ते १५ मिनिटे बाजूला ठेवावे.

५. यानंतर एका कढईत पुऱ्या तळण्यासाठी गॅसवर तेल गरम करावे.

६. भिजत ठेवलेले पीठ घेऊन हाताला तेल लावून पुन्हा एकदा चांगले पीठ मळावे आणि पुऱ्या लाटण्यास घ्यावे.

७. यानंतर पिठाचे आवडीप्रमाणे लहान- मोठे गोळे तयार करून पोळपाटवर पुरीच्या आकाराने लाटावे.

८. एक- एक करून सर्व पुऱ्या गरम तेलात तळून खाताना गरम पुऱ्यावर तूप टाकूनही तसेच खाऊ शकता. किंवा हिरवी चटणी, लोणचे आणि सॉससोबतही खाऊ शकता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news