Diwali Lakshmi Puja Prasad : लक्ष्मीपूजनाला असा बनवा खास पिस्ता कलाकंदचा प्रसाद

कलाकंद
कलाकंद
Published on: 
Updated on: 

पुढारी ऑनलाईन डेस्क : दीपावलीच्या शुभ निमित्ताने लक्ष्मीपूजन केले जाते. देवी लक्ष्मीचे प्रतिमापूजन करून गोड प्रसादाचा नैवेद्य दाखवला जातो. यावेळी लक्ष्मीपूजनासाठी खास प्रसाद बनवा. हा प्रसाद लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल. (Diwali Lakshmi Puja Prasad) दिवाळीला सायंकाळी होणारे लक्ष्मी पूजनासाठी मिठाई बाजारातून आणण्यापेक्षा बाजारासारखच मिठाई घरी बनवू शकता. देवी लक्ष्मीला पांढऱ्या रंगाची मिठाई प्रिय आहे. तर पाहुया लक्ष्मीपूजनासाठी खास मिठाई कलाकंद कसा तयार करायचा. जाणून घ्या रेसिपी. (Diwali Lakshmi Puja Prasad)

कलाकंद खायला चविष्ट लागते. शिवाय पिस्ता हा आरोग्यदायी आहेच. दुधातून कॅल्शियमदेखील मिळते. तुपामुळे  शरीराला आवश्यक असणारे स्निग्धता मिळते. कलाकंद रेसिपी करायला सोपी आणि सहज आहे. फार खर्चिक आणि वेळखाऊ देखील नाही.

[saswp_tiny_recipe recipe_by="स्वालिया शिकलगार" course="गोड पदार्थ" cusine="महाराष्ट्रीयन" difficulty="सोपे" servings="१०" prepration_time="२५" cooking_time="२५" calories="" image="" ingradient_name-0="किसलेले पनीर" ingradient_name-1="दूध" ingradient_name-2="साखर" ingradient_name-3="वेलदोडे पावडर" ingradient_name-4="तूप" ingradient_name-5="बारीक कापलेला पिस्ता" direction_name-0="पनीर किसून घ्या" direction_name-1="गॅस मंद आचेवर ठेवून कढई गरम करायला ठेवा" direction_name-2="आता कढईमध्ये पनीर आणि दूध शिजवून घ्या" direction_name-3="हे मिश्रण तोपर्यंत ढवळत राहा, जोपर्यंत मिश्रण थोडे घट्ट होत नाही" direction_name-4="आता यामध्ये साखर आणि वेलदोडे पावडर घालून मिश्रण हलवत राहा" direction_name-5="एका प्लेटमध्ये तूप लावून घ्या आणि हे मिश्रण पसरवून घ्या." direction_name-6="यावर बारिक कापलेला पिस्ता टाकून थोडे दाबून घ्या म्हणजे पिस्ता मिश्रणात घट्ट बसेल" direction_name-7="आता कलाकंद फ्रिजमध्ये दोन तासांसाठी ठेवून द्या" direction_name-8="फ्रिजमधून कलाकंद काढून त्याचे तुकडे तयार करून घ्या" direction_name-9="स्वादिष्ट कलाकंद प्रसादासाठी तयार आहे" notes_name-0="" html="true"]

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news