Kachya Kairiche Sarbat : उन्हाळ्यात बनवा कच्च्या कैरीचं सरबत

 Kachya Kairiche Sarbat
Kachya Kairiche Sarbat

पुढारी ऑनलाईन डेस्क : कडक उन्हाळ्याच्या दिवसांत सर्वांनाच उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. आहारात बदल करून थंडगार पदार्थ चाखण्या कडे कल वाढतो. शीतपेयांसोबत काकडी, मठ्ठा, वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रिम आणि मसाले ताक या पदार्थांचे जास्तीत- जास्त सेवन केले जाते. सध्या आंब्याचा सीझन सुरू झाला आहे. पिकलेले आंबे तर सर्वांनाच आवडतातच. सोबत कच्चा कैरीचा जर एखादा चविष्ट पदार्थ जर तुम्हाला चाखालया मिळाला तर! आम्ही तुम्हाला सहज आणि सोपी रेसिपी सांगणार आहोत, जी कच्च्या कैरीपासून तुम्हाल बनवता येईल. चला तर मग उन्हाळ्यात कच्च्या कैरीचं सरबत कसे बनवायचे, जाणून घेऊया.. ( Kachya Kairiche Sarbat )

साहित्य –

कच्ची कैरी- ३- ४
जिरे- १ चमचा
हिंग- अर्धा चमचा
पुदिना – १०-१२ पाने
साखर किंवा गुळ – पावशेर
मीठ- चवीनुसार

कृती-

१. पहिल्यांदा ३- ४ कच्ची कैरी घेऊन ती स्वच्छ पाण्याने धुवावी.

२. धुतल्यानंतर कैरी एक ते दीड तास पाण्यात भिजत ठेवावी.

३. दीड तासानंतर कैरी स्वच्छ कापड्याने पुसून घेऊन त्यावरील साल काढून टाकावी.

४. यानंतर कैरीच्या मध्य भागातील कोय काढून टाकावी. कैरीचे छोटे- छोटे तुकडे करून घ्यावेत.

५. बारीक केलेले कैरीचे तुकडे मिक्सरच्या भांड्यात घालावे.

६. या मिश्रणात पुदिनाची पाने, अर्धा चमचा हिंग, एक चमचा जिरे, साखर किंवा गुळ आणि चवीपुरते मीठ घालून वाटून घ्यावे.

७. या मिश्रणात १ ते २ ग्लास पाणी घालावे आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे.

८. हे मिश्रण गाळणीने गाळून घ्यावे. (सरबत जास्त गोड हवे असल्यास पाण्याचे प्रमाण वाढवावे.)

९. एका ग्लासमध्ये २-३ बर्फाचे तुकडे घालून गाळलेले मिश्रण त्यात ओतावे.

१०. उन्हाळ्यात थंडगार कच्च्या कैरीचं सरबत तुमच्यासाठी तयार आहे. ( Kachya Kairiche Sarbat )

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news